JOIN US
मराठी बातम्या / देश / ज्योतिरादित्य शिंदेंना कुटुंबियांची साथ; मुलगा म्हणाला, वडिलांच्या निर्णयाचा अभिमान!

ज्योतिरादित्य शिंदेंना कुटुंबियांची साथ; मुलगा म्हणाला, वडिलांच्या निर्णयाचा अभिमान!

मध्य प्रदेशात (Madhya Pradesh)मोठा राजकीय भूकंप आला आहे. काँग्रेसचे दिग्गज नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली,10 मार्च: मध्य प्रदेशात (Madhya Pradesh)मोठा राजकीय भूकंप आला आहे. काँग्रेसचे दिग्गज नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. मागील काही दिवसांपासून ज्योतिरादित्य शिंदे पक्षाच्या धोरणांवर नाराज होते. ज्योतिरादित्य शिंदे भाजपच्या वाटेवर आहेत. मंगळवारी सायंकाळी ते भाजपमध्ये अधिकृत प्रवेश करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. दुसरीकडे, ज्योतिरादित्य शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयात त्यांनी कुटुंबियांची साथ मिळाली आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांचे चिरंजीव महाआर्यमन शिंदे यांनी एक ट्वीट केले आहे. माझ्या वडिलांनी घेतलेल्या निर्णयाचा मला अभिमान आहे. कारण, त्यांनी स्वत: साठी हा निर्णय घेतला आहे. राजकारणाचा एक महत्त्वपूर्ण भाग असलेल्या व्यक्तीला राजीनामा देण्यासाठी मोठे ध्येर्य असावं लागतं, असं आर्यनम यांनी म्हटलं आहे. आर्यमन यांनी सांगितले की, माझ्या कुटुंबाला कधीही सत्तेची लालसा नाही. भारत आणि मध्य प्रदेशाच्या विकासाठी सकारात्मक बदल करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

संबंधित बातम्या

हेही वाचा.. मध्यप्रदेशात ‘कमळ’फुलणार, ज्योतिरादित्य समर्थक 21 आमदारांचे राजीनामे यूएसमधील येल यूनिव्हर्सिटीत केले शिक्षण ज्योतिरादित्य यांचे चिरंजीव आर्यमन सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहे. 23 वर्षीय आर्यमन यांनी यूएसमधील येल यूनिव्हर्सिटीत शिक्षण घेतले आहे. दरम्यान, हरियाणाचे नेते नेता कुलदीप विश्नोई यांनी ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेलसा सोडचिठ्ठी दिल्याबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. कुलदीप विश्नोई यांनी एक ट्वीट केले आहे. त्याला आर्यमन यांनी रिट्वीट करुन वडिलांचा निर्णय योग्य असल्याचे म्हटले आहे. भाजपमध्ये प्रवेश करणार काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर ज्योतिरादित्य शिंदे मंगळवारी सायंकाळी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. दरम्यान, ज्योतिरादित्य यांनी राजीनामा देण्यापूर्वी गृहमंत्री अमित शहा (Amit Shah)आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची भेट घेतली होती. हेही वाचा.. ‘महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीत होणार बंडखोरी ’ काँग्रेसने केले निलंबित.. जवळपास दोन दशके काँग्रेसमध्ये असलेले ज्योतिरादित्य शिंदे यांनी राजीनामा दिला आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसने त्यांच्यावर कारवाई केली आहे. पक्षाविरोधा गेल्याने ज्योतिरादित्य यांना काँग्रेसमधून निलंबित केलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या