मागील काही दिवसांपासून अनेक राज्यांमध्ये पावसाने धुमाकूळ घातला. त्यामुळे काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
अजहर खान, प्रतिनिधी सिवनी, 24 जुलै : मागील काही दिवसांपासून अनेक राज्यांमध्ये पावसाने धुमाकूळ घातला. त्यामुळे विविध भागातील नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचं आणि स्वतःची, आपल्या प्रियजनांची काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. मात्र अशातच मध्यप्रदेशच्या सिवनी भागातून एक हृदयद्रावक घटना समोर आली. चार चिमुकल्यांचा तलावात बुडून मृत्यू झाला. रविवारी धोबीसर्रा गावात घडलेल्या या दुर्घटनेत ऋतिक चक्रवर्ती (वय - 10), आयुष विश्वकर्मा (वय - 8), आरव तुमराम (वय - 5.5) आणि ऋषभ विश्वकर्मा (वय - 5) या चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, एकाच गावात वेगवेगळ्या कुटुंबात राहणारी ही चार मुलं रविवारी दुपारी मोठ्या हौशीने गावाजवळील तलावात आंघोळीसाठी गेली होती. चौघांनीही पाण्यात डुबकी मारली, मात्र त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. काही कळायच्या आतच ते खोलवर गेले आणि पाण्यात बुडाले. बराच वेळ झाला मुलं घरी आली नाहीत, म्हणून घरच्यांनी शोधाशोध सुरू केली. तलावाजवळ कोणीही दिसलं नाही, म्हणून पोलिसांना माहिती देण्यात आली. सचिन फक्त एक मोहरा? सीमाचा उद्देश वेगळाच? वाचा महत्त्वाची अपडेट शोधमोहिमेनंतर रविवारी रात्री या मुलांचे मृतदेह आढळले. पोलिसांनी चारही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. दरम्यान, चार चिमुकल्यांचा एकत्र मृत्यू झाल्याने संपूर्ण गाव सुन्न झालं आहे. तर, मुलांच्या कुटुंबियांवर जणू दुःखाचं डोंगर कोसळलं आहे.