JOIN US
मराठी बातम्या / देश / लॉकडाऊन नसतं तर उद्भवली असती अशी भयावह परिस्थिती, रिपोर्ट आला समोर

लॉकडाऊन नसतं तर उद्भवली असती अशी भयावह परिस्थिती, रिपोर्ट आला समोर

जगभरात कोरोना संक्रमणाची संख्या 38 लाखांच्या पुढे गेली आहे तर दोन लाखांवर नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 8 मे: जगभरात कोरोना संक्रमणाची संख्या 38 लाखांच्या पुढे गेली आहे तर दोन लाखांवर नागरिकांचा मृत्यू झाला आहे. भारतातील कोरोना संक्रमणाची संख्या 52 हजारांवर पोहोचली आहे. कोरोना विषाणूमुळे जगातील बऱ्याच देशात लॉकडाऊन आहे, मात्र, हा लॉकडाऊन नसता तर काय झालं असतं? त्याबद्दल विचार करणे आवश्यक आहे. आंतरराष्ट्रीय लोकसंख्येच्या संस्थेचा (आयआयपीएस) अहवाल समोर आला आहे. मुंबईच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर पॉप्युलेशन सायन्सेसने (आयआयपीएस) केलेल्या अहवालात असे म्हटले आहे की, भारतात लॉकडाऊन नसतं तर सुमारे 43 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली असती. जवळजवळ 33 हजार नागरिकांचा मृत्यू झाला असता. या संशोधनासाठी पुनरुत्पादन क्रमांक (आरवो ) स्केल वापरला गेला. लॉकडाऊनपूर्वी आर वोची गणना 2.56 होती, जी लॉकडाऊननंतर 1.16 झाली होती आहे. हेही वाचा…  पंकजा मुंडे, एकनाथ खडसेंना पुन्हा डावललं, भाजपनं जाहीर केली या उमेदवारांची नावं एका माणसाकडून 2.56 लोक संसर्गित होत होते. फक्त समजून घेण्याचा प्रयत्न करा, लॉकडाऊनपूर्वी एखादी व्यक्ती 2. 56 लोकांना संक्रमित करीत होती, परंतु लॉकडाऊननंतर ती 1.16 लोकांना संक्रमित करीत आहे. सोबतच 4 ते 16 एप्रिलदरम्यान आरवो 1.56 च्या जवळ होता जो आता कमी होऊन 1.16 वर आलं आहे, परंतु तो अजूनही अपेक्षेपेक्षा जास्त आहे. लॉकडाऊन कायद्याचे पालन न केल्यास ही संख्या पुन्हा वाढू शकते, असे संशोधकांना वाटते. लॉकडाऊनमुळे भारताने कोरोना संक्रमण जवळजवळ आठ पट कमी झाल्याचे संशोधनातून दिसून आले आहे. भारतात लॉकडाऊन नसता तर गेल्या एका महिन्यात इथल्या संक्रमणाची संख्या चार लाखांवर गेली असती. देशात लॉकडाऊन झाले नसते तर एप्रिलच्या अखेरीस सक्रीय संक्रमणाची संख्या अडीच लाख झाली असती. 3 मेपर्यंत 4,34,431 नागरिकांना कोरोनाची लागण झाली असती. एकूणात कोरोनाला थांबवण्याचा एकच मार्ग आहे आणि तो लॉकडाऊन आहे. त्यातही सोशल डिस्टंसिंग ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. हेही वाचा… औरंगाबादमध्ये कोरोनाचा कहर! SRP चे 72 जवान पॉझिटिव्ह, हॉटस्पॉटमध्ये केली ड्युटी

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या