औरंगाबादमध्ये कोरोनाचा कहर! SRP चे 72 जवान पॉझिटिव्ह, हॉटस्पॉटमध्ये केली ड्युटी

औरंगाबादमध्ये कोरोनाचा कहर! SRP चे 72 जवान पॉझिटिव्ह, हॉटस्पॉटमध्ये केली ड्युटी

राज्यात कोरोनानं थैमान घातलं असताना मुंबई, पुणेपाठोपाठ औरंगाबादेतही कोरोनानं अक्षरश: कहर केला आहे.

  • Share this:

औरंगाबाद, 8 मे: राज्यात कोरोनानं थैमान घातलं असताना मुंबई, पुणेपाठोपाठ औरंगाबादेतही कोरोनानं अक्षरश: कहर केला आहे. औरंगाबाद शहरात राज्य राखीव दलााचे जवान (SRPF) कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. SRPF च्या 72 जवानांना कोरोनाची लागण झाली आहे. जवानांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. हे जवान काही दिवस मालेगावमध्ये कामावर होते, अशी माहिती मिळाली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 468 झाली आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे 12 जणांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी सकाळी एका 75 वर्षीय वृद्धेचा मृत्यू झाला. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे.

हेही वाचा...जीवावर उदार होऊ नका,मृत मजुरांच्या कुटुंबीयांसाठी उद्धव ठाकरेंनी केली मोठी घोषणा

दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे 12 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 26 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश लड्डा यांनी दिली आहे.

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्याची राजधानी मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सर्वाधिक आढळून आली आहे. तर दुसरीकडे मराठवाड्याच्या राजधानीचे शहर औरंगाबाद आता कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे.

कोरोनाबाधित रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेल्या जिल्ह्यात मुंबई, पुणे, मालेगावनंतर आता औरंगाबाद शहराचा नंबर लागला आहे. त्याचं कारणही तसंच आहे. शहरात 13 मार्च रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. मात्र नंतर महिनाभरात एकही नवीन रुग्ण आढळून आला नाही. शिवाय पहिली महिला रुग्ण ही उपचाराअंती ठणठणीत बरी होऊन घरी परतली. त्यामुळे औरंगाबादकरांना काहीसा दिलासा मिळाला होता. परंतु, एप्रिल महिन्यात शहरात हॉटस्पॉटही वाढत गेले.

हेही वाचा...तरुणीच्या अंत्यदर्शनाला जाऊन 45 जणांनी धोक्यात घातला जीव, नंतर झालं असं..

शहरातील किलेअर्क, नूर कॉलनी, आसिफिया कॉलनी,भीमनगर, सातारा परिसर, देवळाई, समतानगर या परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. परंतु, 21 मार्च ते 1 मेपर्यंत शहरातील इतर परिसरात कोरोनाबाधित रुग्णांची आकडेवारी समोर आल्यामुळे एकच खळबळ उडाली. यामध्ये नुर कॉलनी, मुकुंदवाडी, संजयनगर, भीमनगर भावसिंगपुरा या भागात मोठ्या संख्येनं कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले.

First published: May 8, 2020, 1:23 PM IST

ताज्या बातम्या