नवी दिल्ली 11 मे: देशातल्या सगळ्यांचं लक्ष लागलं होतं ते रेल्वे सेवा कधी सुरू होणार याकडे. ही सेवा 12 मेपासून सुरू होणार असून त्याचं बुकिंग आज 4 वाजतापासून सुरू होणार होतं. मात्र बुकिंग सुरू होताच वेबसाईट बंद पडली त्यामुळे प्रवाशांची निराशा झाली. नव्या गाड्या आणि त्यांचे मार्ग याची माहिती अपडेट करणं सुरू असल्याने वेबसाईट(https://www.irctc.co.in/nget/ हँग होत असल्याचं स्पष्टिकरण रेल्वेने दिलं आहे. सरकारने 12 मे 2020 पासून 15 स्पेशल एसी ट्रेन सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. विविध राज्यांमध्ये उद्यापासून या ट्रेनची सुरूवात होणार आहे. या रेल्वे प्रवासासाठी तिकीटांचे बुकिंग केवळ ऑनलाइन होणार आहे. आयआरसीटीसी (IRCTC) च्या वेबसाइटवरूनच हे बुकिंग करता येणार आहे. या प्रवासासाठी कोणत्याही स्थानकाच्या काउंटवर तिकीट मिळणार नाही. या रेल्वे स्पेशल रेल्वे म्हणून नवी दिल्ली स्टेशन वरून दिब्रुगड, आगरताळा, हावडा, पटना बिलासपुर, रांची, भुवनेश्वर, सिकंदराबाद, बंगळुरू पर्यंत असेल. तसेच चेन्नई, तिरुवनन्तपुरम, मडगाव, मुंबई सेंट्रल, अहमदाबाद आणि जम्मूतावी या शहरांतूनही रेल्वे सेवा सुरू सुरू होतील. या रेल्वेने जर तुम्हाला प्रवास करायचा असेल तर काही नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. काही गोष्टी ध्यानात ठेवल्यास सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करणे शक्य आहे. कोरोना संक्रमण रोखण्यासाठी हे नियम पाळणे अत्यंत आवश्यक आहे-
-प्रवाशांना दोन तास आधी रेल्वे स्थानकात पोहोचणे आवश्यक आहे. -ज्या प्रवाशांकडे कन्फर्म्ड आणि वैध तिकीट असेल त्यांनाच प्रवास करण्याची परवानगी देण्यात येईल. -प्रवासादरम्यान मास्क घालणे बंधनकारक राहील. मास्कसाठी तुम्ही गमछा किंवा स्कार्फचा देखील वापर करू शकता. रेल्वे सुरू होण्याआधी रेल्वे प्रवाशांना स्क्रिनिंग प्रक्रिया पूर्ण करावी लागेल लक्षणं नाहीत तरी 7 टेस्ट पॉझिटिव्ह; कोरोनाग्रस्तांच्या डिस्चार्ज नियमांवर प्रश्न -सोशल डिस्टिंसिंगच्या नियमांचे पालन काटेरोरपणे करणं आवश्यक आहे -ज्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षण नाही आहेत, त्यांनाच रेल्वेमध्ये चढण्यास परवानगी देण्यात आली आहे. -सर्व प्रवाशांच्या फोनमध्ये आरोग्य सेतू अॅप असणे गरजेचे आहे, अन्यथा ट्रेनमध्ये चढता येणार नाही -ट्रेनमध्ये तुम्हाला रेल्वे विभागाकडून चादर किंवा पांघरूण मिळणार नाही. कोरोनाच्या संक्रमणाचा धोका लक्षात घेता शासनाने ही योजना बंद केली आहे. हे वाचा - मोदी सरकारची ही योजना तरुणांंसाठी फायदेशीर, मिळणार 3.75 लाखांची मदत चालत गावी निघालेल्या महिलेने रस्त्यातच दिला बाळाला जन्म, प्रसूतीनंतरही…