Home /News /national /

लक्षणं नाहीत तरी 7 टेस्ट पॉझिटिव्ह; कोरोना रुग्णांच्या डिस्चार्जबाबत नव्या नियमांवर प्रश्नचिन्ह

लक्षणं नाहीत तरी 7 टेस्ट पॉझिटिव्ह; कोरोना रुग्णांच्या डिस्चार्जबाबत नव्या नियमांवर प्रश्नचिन्ह

कोरोना रुग्णांची एकूण संख्या ही 60 लाखांपेक्षा जास्त झाली आहे.

कोरोना रुग्णांची एकूण संख्या ही 60 लाखांपेक्षा जास्त झाली आहे.

फक्त गंभीर रुग्णांचीच कोरोना टेस्ट (Corona test) करून त्यांना डिस्चार्ज (discharge) द्यावा, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.

    नवी दिल्ली, 11 मे : लक्षणं नसलेले किंवा सौम्य आणि मध्य लक्षणं असलेले कोरोना रुग्ण बरे झाल्यानंतर म्हणजे त्यांची लक्षणं पूर्णपणे गेल्यानंतर त्यांची कोरोना टेस्ट (corona test) न करताच त्यांना 10 दिवसांत डिस्चार्ज द्यावा. कोरोना रुग्णांच्या डिस्चार्जबाबत (corona patient discharge) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने हा नवा नियम जारी केला. मात्र आता त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. कारण लक्षणं न दिसताच एका कोरोना रुग्णाची 7 वेळा कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आलेली आहे. द प्रिंटनं दिलेल्या वृत्तानुसार वडोदरातील 19 वर्षांच्या किरण पटेलचे (नाव बदलेलं) 7 टेस्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्यात. मात्र त्याच्यामध्ये कोणतीच लक्षणं नाहीत, त्याला कोणती समस्या किंवा त्रासही नाही. वडोदरातील हाय स्पीड रेल्वे ट्रेनिंग इन्स्टिट्युटमध्ये त्याला ठेवण्यात आलं आहे, जिथं त्याच्यासारखे अनेक लक्षणं न दिसणारे किंवा सौम्य लक्षणं असणारे रुग्ण आहेत. हे वाचा - कोरोना रुग्णांच्या डिस्चार्ज नियमात बदल, आता 'या' अटींनुसार रुग्णालयातून सोडणा द प्रिंटशी बोलताना किरणनं सांगितलं, "मला खोकला नाही, थकवा जाणवत नाही, माझं डोकंही दुखत नाही. मी चित्रपट पाहतो, फोनवर बोलतो, गेम खेळतो असाच काही टाइमपास करत असतो" 12 एप्रिलला किरण आणि त्याच्या आईवडिलांना कोरोनाव्हायरस असल्याचं निदान झालं. कोरोनाचं हॉटस्पॉट असलेल्या वडोदरातच ते राहतात. त्यांच्या शेजारील एका मुलाचा आजारानं मृत्यू झाल्यानंतर त्यांनी कोरोना टेस्ट केली होती आणि ते पॉझिटिव्ह असल्याचं समजलं. मात्र ज्या मुलाचा कोरोनाव्हायरसमुळे मृत्यू झाला असावा असं त्यांना वाटत होतं, त्याला नंतर डेंग्यू असल्याचं निदान झालं. किरणला त्याच्या आईवडिलांसह रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याचे पालक 13 दिवसांत कोरोना नेगेटिव्ह झाले, त्यांना घरी पाठवण्यात आलं.  मात्र किरण कोरोना पॉझिटिव्ह होता, तरी त्याच्यामध्ये लक्षणं नव्हती त्यामुळे त्याला आठवडाभरापूर्वीच क्वारंटाइन करण्यात आलं. त्याला आता कोरोनाचं निदान झाल्यापासून एक महिना पूर्ण झाला आहे. हे वाचा - Corona रुग्णांचा मृत्यू कसा झाला? आता डॉक्टरांना कारण द्यावं लागणार किरणला कोरोनाव्हारसचं निदान होऊन एक महिना उलटला, शिवाय त्याच्यात कोणती लक्षणंही नाहीत. केंद्र सरकारच्या नव्या गाइडलाइन्सनुसार त्याला टेस्ट न करताच घरी जाता येणार आहे. मात्र जोपर्यंत आपली टेस्ट कोरोना नेगेटिव्ह येत नाही तोपर्यंत आपण घरी जाणार नसल्याचं किरणनं म्हटलं आहे. "मला माझ्या पालकांना पुन्हा संक्रमित करायचं नाही. माझा कोरोना टेस्ट रिपोर्ट सलग 2 वेळा नेगेटिव्ह येण्याची वाट मी पाहेन. तसंच इथं किमान मला गरज असल्यास मी डॉक्टरांना तरी बोलवू शकतो, घरी गेल्यानंतर मला तशी सुविधा मिळणार नाही", असं त्याचं म्हणणं आहे. किरणला आता आपली आठवी टेस्ट तरी नेगेटिव्ह येण्याची प्रतीक्षा आहे, जेणेकरून तो घरी जाईल. मात्र त्याच्यासारखे असे अनेक रुग्ण आहेत, ज्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणं नाहीत किंवा सौम्य लक्षणं आहेत. असे रुग्ण बरे होताच कोरोना टेस्ट न करताच त्यांना डिस्चार्ज द्यावा, फक्त गंभीर रुग्णच बरे झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यापूर्वी कोरोना टेस्ट करावी असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं नव्या नियमावलीत नमूद केलं आहे. त्यात लक्षणं न दिसणारे रुग्णही कोरोना पसरवत आहेत. अहमदाबादमध्येच तब्बल 334 सुपर स्प्रेडर सापडलेत. त्यामुळे डिस्चार्जबाबतच्या या नव्या नियमावलीमुळे कोरोनाचा धोका वाढणार तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित होतो आहे. संपादन - प्रिया लाड हे वाचा - अरे बापरे! शहरात तब्बल 334 कोरोना सुपर स्प्रेडर; नकळत पसरवत आहेत व्हायरस
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या