मुंबई, 11 मे : लॉकडाऊनमध्ये विविध भागांमध्ये अडकलेले मजूर पायीच आपल्या गावाच्या दिशेने प्रवास करीत आहेत. अनेक मजूर आपल्या गावी पोहोचू शकले नाही. वाटेतच अपघातात अनेकांचा मृत्यू झाला. अजूनही मजुरांचा पायी प्रवासाचं सत्र सुरूच आहे.
त्यातच एक मन हेलावून टाकणारी माहिती समोर आली आहे. या घटनेवरुन लक्षात येईल की त्यांच्यासमोर आव्हानं खूप मोठी आहेत. 30 वर्षांची एक महिला मजूर महाराष्ट्रातून मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यातील आपल्या गावी जाण्यासाठी पायीच निघाली होती. मात्र रस्त्यात प्रसवकळा सुरू झाल्याने तिला पुढे एक पाऊल टाकता येईना. जवळपास एकही रुग्णालय नव्हते. अशावेळी त्यांनी उचलेलं पाऊल अत्यंत जोखमीचं होतं.
उन्हात साडी बांधून केली प्रसूती
मजुराचे अनेक कुटुंब पायी प्रवास करीत होते. यामध्ये 2 गर्भवती महिला होत्या. ज्यापैकी शकुंतला नऊ महिन्याची गरोदर होती. हे लोक नाशिकहून 30 किमीच्या आधीपासून पायी चालत होते. प्रवासादरम्यान नाशिक आणि धुळ्यामध्ये महाराष्ट्र ग्राम पिपरीमध्ये शकुंतला हिला प्रसववेदना सुरू झाल्या. जवळपास रुग्णालय दिसत नसल्याने सोबत असलेल्या महिन्यांना रस्त्याच्या कोपऱ्यात साडींच्या आडोशात महिलेची प्रसूती केली. शकुंतलाने एका मुलीला जन्म दिला.
प्रसूतीनंतरही प्रवास सुरूच
शकुंतलाला 4 मुलं आहेत. हा तिचा 5 वा मुलगा. प्रसूती झाल्यानंतर या महिलेने बाळासह 160 किमी पायी प्रवास पूर्ण केला. राज्य सीमावर तपास करणाऱ्या पोलिसांनी जेव्हा महिलेच्या हातात तान्ह बाळं पाहिलं तेव्हा त्यांची विचारपूस केली आणि हा सर्व प्रकार समोर आला. पोलिसांनी शकुंतला तिचा पती आणि नवजात बाळासह पाचही जणांना एकलव्य छात्रावासमध्ये पोहोचविले. येथे त्यांच्या राहण्याची आणि खाण्याची सोय करण्यात आली आहे. शिवाय त्यांना घरी सोडण्यासाठी बसची व्यवस्थाही करण्यात आली आहे.
संबंधित-धक्कादायक! कोरोना पॉझिटिव्ह महिलेवर बलात्कार; आरोपीसह कैदीही क्वारंटाईन
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona virus in india