JOIN US
मराठी बातम्या / देश / बाबो! दारूनंतर खर्रा आणि तंबाखूसाठी एवढी मोठी रांग, महिला आघाडीवर

बाबो! दारूनंतर खर्रा आणि तंबाखूसाठी एवढी मोठी रांग, महिला आघाडीवर

लॉकडाऊन तीनदरम्यान दारू विक्रीसाठी परवानगी दिल्यानंतर दारूच्या दुकानांबाहेर तुफान गर्दी पाहायला मिळाली होती.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

जामनगर, 19 मे : लॉकडाऊन तीनदरम्यान दारू विक्रीसाठी परवानगी दिल्यानंतर दारूच्या दुकानांबाहेर तुफान गर्दी पाहायला मिळाली होती. त्यामध्ये महिलांचाही समावेश होता. सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवत दारूच्या दुकानांबाहेर तुफान गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं होतं. तशाच पद्धतीनं आता दारूनंतर लॉकडाऊन 4 मध्ये दुसऱ्याच दिवशी खर्रा आणि तंबाखूसाठी गुजरातचा जामनगर परिसरात गर्दी पाहायला मिळाली आहे. तंबाखू आणि खर्रा खाण्यासाठी महिलांनी लांब रांग लावल्याचं पाहायला मिळालं. सोशल मीडियावर गुजरातमधील जामनगर इथला व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. दारूनंतर आता तंबाखूसाठी ही रांग पहिल्यानंतर महिला आघाडीवर असल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळालं आहे. या व्हिडीओमध्ये महिला एकमेकांना खेटून उभ्या असलेल्या दिसत आहेत.

संबंधित बातम्या

हे वाचा- डबल मर्डरचा LIVE VIDEO, समाजवादी पक्षाचे नेते आणि मुलावर भर दिवसा झाडल्या गोळ्या तळीरामांनी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवल्यानंतर अनेक राज्यात मद्यविक्री करण्यावर बंदी आली. अनेक राज्यांमध्ये ऑनलाई दारू विक्रीसाठी परवानगी देण्यात आली आहे. आता दारूनंतर खर्रा आणि तंबाखूसाठी जीवाची पर्वा न करता या महिलांनी गर्दी केली आहे. व्यसन आणि व्यसनाच्या आहारी जाणं या दोन्ही गोष्टी जीवावर बेतू शकतात याची कल्पना असतानाही केवळ व्यसनापोटी या महिलांना गर्दी केल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. हे वाचा- दारुड्या मित्राचा त्रास किती सहन करायचा, अखेर चार मित्र एकत्र आले आणि… हे वाचा- बापाचा लेकरासाठी जीव तुटला, पण मुलानेच हात उगारला कारण… संपादन- क्रांती कानेटकर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या