मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

डबल मर्डरचा LIVE VIDEO, समाजवादी पक्षाचे नेते आणि मुलावर भर दिवसा झाडल्या गोळ्या

डबल मर्डरचा LIVE VIDEO, समाजवादी पक्षाचे नेते आणि मुलावर भर दिवसा झाडल्या गोळ्या

भर दिवसा सगळ्यांसमोर झालेल्या या दुहेरी हत्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

भर दिवसा सगळ्यांसमोर झालेल्या या दुहेरी हत्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

भर दिवसा सगळ्यांसमोर झालेल्या या दुहेरी हत्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

  • Published by:  Manoj Khandekar
संभल( उत्तर प्रदेश), 19 मे : लॉकडाऊनमध्ये डबल मर्डरचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. समाजवादी पक्षाचे नेते आणि त्यांच्या मुलाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे याचा लाईव्ह व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. भर दिवसा सगळ्यांसमोर झालेल्या या दुहेरी हत्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. सपा नेते छोटा लाल दिवाकर आणि त्याचा मुलगा सकाळी शेतात फिरण्यासाठी गेले असता तिथे त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. मृत सपा नेते चंदौसी या विधानसभा मतदार संघातील समाजवादी पक्षाचे माजी उमेदवार होते. गावातीलच ग्रामस्थांवर त्यांच्या दुहेरी हत्येचा आरोप करण्यात आला आहे. बहजोई पोलीस स्टेशन परिसरातील शमशोई गावात ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गावात नरेगा योजनेंतर्गत बनवल्या जाण्याऱ्या रस्त्यावरून वाद झाला असल्याचं समोर आलं आहे. घटना घडल्यानंतर मारेकरी फरार झाल्याचं सांगण्यात येत आहे. त्यांनी पकडण्यासाठी एसपीने तीन पोलीस पथकं कामाला लावली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मृता छोटा लाल दिवाकर यांची पत्नी ग्रामप्रमुख आहे. नरेगा योजनेंतर्गत बनवल्या जाणाऱ्या रस्त्याला ते विरोध करत होते. त्यामुळे हा वाद झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. गावात भर दिवसा अशा प्रकारे हत्येची घटना घडल्यामुळे संपूर्ण गावात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. तर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून दोन मृतदेह ताब्यात घेतले असून ते शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. तर आरोपींचा तपास करण्याचं काम सध्या पोलीस करत आहेत. संपादन - रेणुका धायबर
First published:

पुढील बातम्या