अकोले, 19 मे : महाराष्ट्रात लॉकडाऊन लागू असल्यामुळे मद्य विक्रीस बंदी होती. तब्बल दीड महिना दारू विक्री बंद होती. अखेरीस घरपोच डिलिव्हरीच्या अटीवर दारू विक्री सुरू करण्यात आली आहे. परंतु, दुसरीकडे दारूच्या नशेत गुन्हेगारीचे प्रमाणही वाढले आहे. दारूच्या नशेत एका मुलाने आपल्याच बापाला संपवल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील अकोलेत घडली आहे.
दैनिक सकाळने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील बोरी इथं घडली. 65 वर्षीय वृद्ध वडिलांनी आपल्याला दारूमध्ये पैसे बरबाद करू नको, पैसे जपून वापर असा सल्ला दिला होता. वडिलांनी असा सल्ला दिला म्हणून दारूच्या नशेत मुलाने लाथा बुक्याने बेदम मारहाण केली. यात त्यांचा मृत्यू झाला. भागवत गोमा कांबळे असं या वृद्ध बापाचे नाव आहे.
हेही वाचा -संशयामुळे प्रेमाचं नातं कधी दिसलंच नाही, हैवानासारखी केली पत्नीची हत्या
बोरी इथं कांबळे वस्तीत राहणारे भागवत कांबळे लॉकडाउनमुळे आपल्या एकुलत्या एक मुलगा राजेंद्र कांबळे याने पैसे दारूवर खर्च करू नये म्हणून समजूत काढत होते. पण, दारूच्या आहारी गेलेल्या मुलाने बापावरच हात उगारला.
राजेंद्र कांबळे दारूच्या आहारी गेला होता. त्यामुळे त्याच्याकडून सुटका व्हावी म्हणून त्याची पत्नी काही दिवसांपासून माहेरी गेली होती. 18 मे रोजी घरात राजेंद्र आणि त्याच्या वडिलांमध्ये पुन्हा वाद झाला. दारूच्या नशेत तर्रर्र असलेल्या मुलाने बापाला लाथ्याबुक्याने बेदम मारहाण केली. यात ते गंभीर जखमी झाले, रुग्णालयात दाखल केले असता उपचारदरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
हेही वाचा -राज्यातील एकमेव ग्रीन झोन जिल्ह्यात कोरोना, प्रशासन झाले अलर्ट; आखला 'हा' प्लॅन
या प्रकरणी मृत भागवत कांबळे मुलींने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी राजेंद्र कांबळेला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.