नवी दिल्ली, 7 जून: मद्यप्रेमीसाठी खूशखबर आहे, ती म्हणजे दिल्लीत आता दारू स्वस्त होणार आहे. दिल्लीतील केजरी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. दारूवर लावण्यात आलेलं कोरोना शुल्क हटवण्याचा निर्णय केजरी सरकारनं घेतला आहे. काही दिवसांपूर्वी सरकारनं दारूवर अतिरिक्त 70 टक्के कोरोना महामारी कर लादला होता. आता येत्या 10 जूनपासून हे शुल्क रद्द करण्यात येणार आहे. परिणामी दारूचे दर कमी होणार आहे.
हेही वाचा.. अमित शहांचा राहुल गांधींवर हल्लाबोल, देशात पहिल्यांदाच घेतली व्हर्च्युअल रॅली दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी पत्रकार परिषदेत सांगितलं की, देशात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारनं लॉकडाऊन लागू केला होता. मात्र, कोरोनाचा कहर सुरूच असल्यानं केंद्र सरकारनं लॉकडाऊन वाढवला आहे. सध्या देशात पाचवा लॉकडाऊन सुरू आहे. मात्र, केंद्र सरकारनं लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात दारूची दुकाने सशर्त उघडण्यास परवानगी दिली होती. सोशल डिस्टंसिंगचं पालन करण्यास सांगण्यात आलं होतं मात्र, तळीरामांनी एकच गोंधळ केला होता. लॉकडाऊनचे नियम पायदळी तुडवून सोशल डिस्टंसिंगचाही फज्जा उडवला होता. दिल्लीत फक्त दिल्लीकरांवरच उपचार… दिल्ली सरकारअंतर्गत येणाऱ्या सर्व सरकारी आणि खासगी रुग्णालयात कोरोना असेपर्यंत फक्त दिल्लीतील नागरिकांवरच उपचार केले जातील. तर, केंद्र सरकारच्या अंतरर्गत येणाऱ्या रुग्णालये सर्वांसाठी खुला राहतील. केजरीवाल यावेळी म्हणाले की, त्यांच्या सरकारने मागच्या आठवड्यात दिल्लीकरांकडे मत मागितले. कोरोना असेपर्यंत दिल्लीतील रुग्णालयात फक्त दिल्लीकरांवरच उपचार व्हावेत, असं 90 टक्के लोकांचे म्हणणे आहे. दिल्ली सरकारने यावर 5 तज्ज्ञांची समिती स्थापन केली होती. यात सांगण्यात आले की, जून महिन्यात दिल्लीत 15 हजार बेडची गरज पडू शकते. यानंतर सरकारने हा निर्णय घेतला. हेही वाचा.. ‘कोरोनाचा लढा’ हा राजकारणाचा विषय नाही, गिरीश महाजन यांचा शिवसेनेला टोला तसेच दिल्लीतील काही खासगी रुग्णालये, जे ऑन्कोलॉजी आणि न्यूरोलॉजीसारख्या खास सर्जरी करतात त्यांना सुरू ठेवण्यास परवानगी असेल. या रुग्णालयात देशातील इतर भागातून येणारे लोक उपचार घेऊ शकतात. यावेळी त्यांनी सांगितले की, सध्या हॉटेल्स आणि बँक्वेट उघडण्याची परवानगी देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री केजरीवाल यांनी दिली.