मुंबई, 22 मार्च : कोरोना व्हायरसचा जगभरात कहर सुरू आहे. भारतात 260 हून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे तर महाराष्ट्रातही 63 लोक कोरोनानं बाधित आहे. जगभरात 11 हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. या महाकाय आजारावर मात करण्यासाठी भारतात आज जनता कर्फ्यू पाळण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना जनता कर्फ्यूचं आवाहन केलं होतं. कोरोनावर मात करण्यासाठी आज भारतात जनतेकडून कर्फ्यू पाळण्यात येणार आहे. जाणून घ्या जनता कर्फ्यूसंदर्भातील देशभरातील लाईव्ह अपडेट्स.