JOIN US
मराठी बातम्या / देश / शाळा-इंटरनेट सेवा बंद, जागोजागी कर्फ्यू... पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये काय घडतंय?

शाळा-इंटरनेट सेवा बंद, जागोजागी कर्फ्यू... पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये काय घडतंय?

पश्चिम बंगालमध्ये, रविवारी संध्याकाळी हुगळी जिल्ह्यातील रिशरा येथे रामनवमीच्या मिरवणुकीत दोन गटांमध्ये वाद झाला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कोलकाता : देशातील दोन राज्यात सध्या वातावरण अत्यंत तणावपूर्ण आहे. ही स्थिती आणखी बिघडू नये म्हणून तिथलं इंटरनेट बंद ठेवण्यात आलं आहे. एवढंच नाही तर कर्फ्यू देखील लावण्यात आला आहे. पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पश्चिम बंगालमध्ये, रविवारी संध्याकाळी हुगळी जिल्ह्यातील रिशरा येथे रामनवमीच्या मिरवणुकीत दोन गटांमध्ये वाद झाला. त्यानंतर तिथली परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागल्याने कर्फ्यु लावण्यात आला आहे. परिस्थिती बिघडू नये म्हणून इंटरनेटही बंद ठेवण्यात आलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामनवमीनिमित्त रिश्रा पोलीस स्टेशन परिसरात दोन मिरवणुका काढण्यात आल्या होत्या. दुसऱ्या मिरवणुकीवर जीटी रोडवरील वेलिंग्टन ज्यूट मिल इथे कोणत्यातरी कारणावरून वाद झाला. या वादाचं रुपांतर हिंसाचारात झालं. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. यामध्ये काही पोलीस जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.

  तरुणींसोबत बाईक स्टंट करणं पडलं महागात, VIDEO viral झाल्यानंतर पोलिसांची कारवाई

भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दिलीप घोष हेही रामनवमीच्या मिरवणुकीत सहभागी झाले होते. दिलीप घोष कार्यक्रमातून निघून गेल्यानंतर अचानक दोन गटांमध्ये हाणामारी सुरू झाली.त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली, असा आरोप भाजप नेत्याने केला.

9 वर्षाच्या मुलीची निर्घृण हत्या; नंतर मृतदेहासोबत.. हादरवणारी घटना

परिस्थिती पाहता घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याआधी बंगालमधील हावडा येथे रामनवमीच्या मिरवणुकीत दोन गटांमध्ये हाणामारी झाली होती. त्यावेळीही अशाच घटना घडल्या होत्या.

बिहारमध्ये देखील परिस्थिती अशीच काहीशी आहे. रामनवमीच्या मिरवणुकीनंतर राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये सुरू झालेल्या गोंधळामुळे अनेक भाग अजूनही परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे तिथली इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. तर पोलिसांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या