उदयपूर, 2 एप्रिल : राजस्थानच्या उदयपूरमधील मावली पोलीस स्टेशन हद्दीतील लोपरा गावात 9 वर्षीय निष्पाप मुलीची निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या निष्पाप मुलीची हत्या केल्यानंतर नराधमांनी तिच्या मृतदेहाचे 10 तुकडे केले आणि ते फेकून दिले. पोलिसांना अवशेषांमधून पॉलिथिनमध्ये मृतदेह सापडले आहेत. मात्र, या प्रकरणी पोलिसांना अद्याप कोणताही ठोस पुरावा मिळालेला नाही. पोलिसांनी अनेक संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. मात्र, या निष्पाप मुलीची हत्या कधी, कोणी आणि का झाली, याबाबत अद्याप काहीही कळू शकलेले नाही.
ही चिमुरडी 27 मार्चला आपल्या घरातून गायब झाली होती. यानंतर मावली पोलीस ठाण्यात ती हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. गेल्या काही दिवसांपासून मुलीचा शोध सुरू होता. दरम्यान, त्याच्या घरापासून काही अंतरावर एका अवशेषाच्या दुर्गंधीने लोकांचे लक्ष वेधले. याबाबतची माहिती मावली पोलीस ठाण्यात देण्यात आली. यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले असता पॉलिथिनमध्ये मृतदेहाचे दोन तुकडे पडलेले होते. या निष्पाप मुलीच्या मृतदेहाचे 10 तुकडे करून फेकण्यात आले होते. या खळबळजनक प्रकरणाची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक माहितीनुसार या मुलीची हत्या करून मृतदेह फेकून देण्यात आला होता. प्रकरणाचे गांभीर्य पाहून श्वान पथक आणि एफएसएल पथकालाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे. मृतदेहाचे सर्व छिन्नविछिन्न अवयव एमबी हॉस्पिटलच्या शवागारात ठेवण्यात आले आहेत. शवागारात पोलीस अधिकारी आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत वैद्यकीय मंडळाने शवविच्छेदन पूर्ण केले. आता शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवाल येण्याची वाट पोलीस पाहत आहेत. अहवाल आल्यानंतर त्याआधारे तपास पुढे जाईल. लग्नानंतरही बॉयफ्रेंडच्या संपर्कात, पतीला झालं माहित अन्… एका निष्पाप मुलीची निर्घृण हत्या केल्यानंतर संपूर्ण गावात संतापाची लाट पसरली आहे. अशा परिस्थितीत पोलीस अधिकारी प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न करत आहेत. आरोपींना लवकरात लवकर अटक करून कुटुंबीयांना नुकसान भरपाई द्यावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. या निष्पाप मुलीची बलात्कारानंतर हत्या झाली आहे का, या प्रकरणाचा नरबळीशी संबंध आहे का, अशा चर्चाही गावपरिसरात होत आहेत. मात्र, या दोन्ही बाबींवर पोलिसांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही.