मुंबई : दोन तरुणींसोबत बाईकवर थरारक स्टंट करणं तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे. बाईक स्टंट करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी रविवारी एका 24 वर्षांच्या तरुणाला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी हा हिस्ट्री शीटर असून त्याच्यावर अँटॉप हिल आणि वडाळा टीटी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. नुकतंच आरोपीने दोन मुलींसह त्याच्या दुचाकीवर थरारक स्टंट केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मुंबई पोलिसांनी फैयाज कादरी नावाच्या एका व्यक्तीला अटक केली आहे. तो दोन तरुणांसोबत बाईकवर स्टंट करत होता. वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स बीकेसी परिसरात ही घटना घडल्याची माहिती मिळाली. व्हिडिओ समोर आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. त्याची चौकशी करून त्याला पकडण्यासाठी एक पथक तयार करण्यात आलं.
कार, बाईक नाही तर थेट घोड्यावर बसून चोराने केली चोरी, Video तुफान व्हायरल#WATCH | Mumbai Police arrested a man namely Faiyaz Qadri, whose bike stunts with two women seated on his two-wheeler had gone viral. The accused was arrested by BKC police under whose jurisdiction the incident took place: Mumbai Police
— ANI (@ANI) April 2, 2023
(Viral video, confirmed by Police) pic.twitter.com/CCRUPNOq4A
Police arrested him from his Antop Hill residence, based on bike's registration number. Upon investigation, it is found that the video is of Dec 2022. Sec 308 of IPC is applied in offence. Accused has a criminal history, he was externed from Wadala TT PS for a year: Mumbai Police
— ANI (@ANI) April 2, 2023
व्हिडिओमध्ये तरुणाने एका तरुणीला पेट्रोलच्या टाकीवर बसवलेलं दिसतं, तर दुसऱ्या तरुणीला पाठीमागे बसवलं आहे. दोन्ही तरुणींना बाईकवर बसवून हा तरुण त्यांच्या मध्ये बसून गाडी चालवताना दिसतो. यानंतर हा तरुण वेगाने दुचाकी पळवताना आणि स्टंट करताना दिसत आहे.
आकाशात जाताच Hot Air Balloon पेटला; आगीचा विळखा वाढला अन् प्रवासी…; भयंकर दुर्घटनेचा LIVE VIDEOस्टंटचा हा व्हिडिओ पॅथहोल वॉरियर्स फाउंडेशन (Pothole Warriors Foundation) या अकाउंटवरून शेअर करण्यात आला होता. ‘दोन तरुणींसह हेल्मेट नसलेला तरुण धोकादायक स्टंट करताना दिसला. त्यांना माहिती आहे की मुंबईतील रस्ते आता पॅथहोल फ्री झालेले आहेत. कृपया यांना पकडा’, असं कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आलं. यानंतर पोलिसांनी व्हिडिओतील तिघांविरुद्ध कलम 144 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.