महत्त्वाचं म्हणजे गावकऱ्यांनी याबाबत एक प्रस्तावही जारी केला आहे.
सौरभ तिवारी, प्रतिनिधी रायपूर, 18 जुलै : अनेकजणांची सकाळ सोशल मीडियाने होते. डोळे उघडताच ते मोबाईल पाहतात. दिवसभरात शरीराला पाणी जेवढं महत्त्वाचं असतं तेवढंच आता इंटरनेटही महत्त्वाचं वाटू लागलं आहे. अशातच तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की, आपल्या भारतात एक असंही गाव आहे जिथे राहणारे लोक मोबाईल आणि इंटरनेट वापरणं पसंत करत नाहीत. म्हणूनच ते गावात किंवा गावाच्या आजूबाजूला कोणतंही टॉवर बांधण्यास परवानगी देत नाहीत. याचं कारण म्हणजे टॉवरमधून निघणाऱ्या रेडिएशनचा पक्षांना त्रास होईल अशी त्यांना भीती वाटते. इथे अनेक एशियन ओपनबिल स्टॉर्क म्हणजे घोंघिल पक्षी आहेत जे फ्लेमिंगोसारखे दिसतात. त्यांनाच वाचवण्याचा प्रयत्न हे नागरिक करत आहेत. आजच्या डिझिटल युगात मोबाईल हा आयुष्याचा अत्यावश्यक भाग बनला आहे. प्रत्येकजण सर्वत्र मोबाईल घेऊन जातात. अनेकजण तर वॉशरूमलादेखील फोनशिवाय जात नाहीत. प्रत्येकाला हाय स्पीड इंटरनेट हवं असतं. मात्र याबाबतीत छत्तीसगडच्या गरियाबंद जिल्ह्यातील 600 कुटुंबांचं लचकेरा गाव अनोखं ठरलं आहे. मोबाईल टॉवरमुळे पक्षांची प्रजनन क्षमता, उंच उड्डाण घेण्याची क्षमता आणि एकूणच त्यांचं जीवन धोक्यात येईल, असं या गावातील नागरिकांना वाटतं.
‘पक्षांना झाडावर घरटं बांधण्यासाठी शांत जागेची आवश्यकता असते. तसेच गावकरी ओपनबिल स्टॉर्क पक्षांवर प्रचंड प्रेम करतात. त्यामुळे आम्हाला इंटरनेट नाही मिळालं तरी चालेल पण हे पक्षी जिवंत राहायला पाहिजे. त्यांचं कोणतंही नुकसान होऊ नये असं गावकरी म्हणतात’, असं गावचे सरपंच उदय निषाद यांनी सांगितलं. महत्त्वाचं म्हणजे गावकऱ्यांनी याबाबत एक प्रस्तावही जारी केला आहे. त्यानुसार या गावाच्या हद्दीत कोणत्याही कंपनीला टॉवर बांधण्याची परवानगी नाही. शिवाय ओपनबिल स्टॉर्क पक्षांना कोणत्याही प्रकारचा धोका पोहोचवणाऱ्यांना 1 हजार रुपयांचा दंडही लागू करण्यात आला आहे.
1200 रुपये किलोची भाजी खाल्ली अन् तब्येतच बिघडली; त्या 15 जणांसोबत असं काय घडलं?
दरम्यान, पावसाळ्यात याठिकाणी हजारो ओपनबिल स्टॉर्क पक्षी स्थलांतर करून येतात. दिवाळीपर्यंत त्यांचा इथेच मुक्काम असतो. भारतासह दक्षिण-पूर्ण आशियात आढळणाऱ्या या भुरकट, शुभ्र पक्षांचे पंख आणि शेपूट चमकदार काळसर असते. ते गोगलगाय, पाण्यात राहणारे साप, बेडूक आणि मोठे किडे खातात. ओपनबिल स्टॉर्क आणि फ्लेमिंगो दोघांनाही लांब पाय असतात. शिवाय शरीरही सारखंच सडपातळ असतं. मात्र त्यांच्या चोची अगदी वेगळ्या असतात.
एशियन ओपनबिल स्टॉर्क म्हणजे घोंघिल पक्षी.