नवी दिल्ली 19 जून: महाराष्ट्रात सत्ताधारी महाविकास आघाडीत कुरबुरी सुरू आहेत. काँग्रेस पक्ष नाराज असल्याचे संकेत पक्षाच्या नेत्यांनी दिले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे सरकारवर संशयाचे ठग निर्माण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपचे राज्यसभेतले खासदार सुब्रम्हण्यम स्वामी यांनी नवा तोडगा सुचवल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने ठाकरे सरकारचा पाठिंबा काढल्यास त्यांना भाजपने पाठिंबा द्यावा आणि सरकार स्थापन करावं असं स्वामी यांनी म्हटलं आहे. राज्यात निर्णय प्रक्रियेत स्थान नाही असं वक्तव्य काँग्रेसच्या नेत्यांनी करून आपली नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर राहुल गांधी यांनीही सरकार शिवसेनेचं आहे महत्त्वांचे निर्णय आम्ही घेत नाही असं म्हटलं होतं. नंतर शिवसेनेकडून समेटाचेही प्रयत्न झाले होते. राज्यात सत्तास्थापन होत असल्याच्या काळापासूनच सुब्रम्हण्यम स्वामी यांनी भाजपने शिवसेनेला पाठिंबा द्यावा अशी सूचना करत आहेत. त्यांनी भाजपवरच टीकाही केली होती. आता राज्यात अस्वस्थता असताना त्यांच्या या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झालं आहे.
दरम्यान, राज्यपालांनी नियुक्त करायच्या 12 जागांवरून महाघाडीतला तणाव कायम आहे. काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली असून पक्षाला 4 जागा पाहिजे आहेत. मात्र राष्ट्रवादी आणि शिवसेना 3 जागांसाठीच राजी आहे. त्यामुळे महाआघाडीत तणावाचं वातावरण आहे. महाआघाडी सरकारच्या मंत्रिमंडळातील वाटा हा आमदारांच्या संख्येवर ठरला होता. त्यानंतर असलेल्या सत्तेत सर्वांना समसमान हिस्सा हे सूत्र ठरलं आहे. त्यानुसार विधानपरिषदच्या बारा जागांमध्ये काँग्रेसला चार जागा मिळतील यावर काँग्रेस ठाम आहे. MPSC मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर, प्रसाद चौगुले राज्यात पहिला राज्यपाल नियुक्त 12 जागांवर महाडघाडी मध्ये रस्सीखेच सुरू आहे. सत्तेतील संख्येनुसार शिवसेना 5, राष्ट्रवादी 4 आणि काँग्रेसला 3 जागा देण्याबाबत चर्चा सुरू होती. काँग्रेसने यावर नाराजी व्यक्त करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मात्र प्रश्न अजूनही सुटलेला नाही. कोरोनाला हरवण्यासाठी खास डाएट प्लॅन; पोलीस कोरोनामुक्त झाल्याचा दावा मंत्रिमंडळामध्ये मंत्रिपद संख्येवर आहे. त्यानंतर येणारे महामंडळ, विधान परिषद आणि राज्यसभेतल्या जागांबाबत समसमान वाटा हे सूत्र आघाडी करतांना ठरल्याचा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि नेते बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. संपादन - अजय कौटिकवार