मुंबई 19 जून : राज्य सेवा मुख्य परीक्षा 2019 निकाल लागला लागला आहे. प्रसाद चौगुले याने बाजी मारत राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. तर पर्वणी पाटील मुलींमध्ये पहिली आली आहे. ही राज्यसेवेची सर्वात मोठी बॅच होती. या बॅच मध्ये 420 अधिकारी झाले आहेत. विद्यार्थ्यांना गेली अनेक दिवस या निकालांची प्रतिक्षा होती. 13 ls 15 जुलै 2019रोजी ही परीक्षा घेण्यात आली होती.
प्रसाद हा सातारा जिल्ह्यातला असून त सर्वसाधारण वर्गातून पहिला आला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातला रविंद्र शेळके हा मागासवर्गियांमधून पहिला आला आहे. तर महिलांमधून अमरावती जिल्ह्यातील पर्वणी पाटील ही पहिली आली आहे. आयोगाच्या वेबसाईटवर पूर्ण निकाल देण्यात आला आहे.
मुख्य परीक्षेसाठी राज्यातून 6825 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातून 1 हजार 326 मुलं मुलाखतीसाठी निवडण्यात आले आहेत. आता त्यातल्या 420 जणांची अधिकारी म्हणून निवड करण्यात येणार आहे.
ज्या विद्यार्थ्यांना पुनर्मुल्यांकनासाठी अर्ज करायचा आहे त्यांनी निकालानंतर 10 दिवसांच्या आत ऑनलाईन फॉर्म भरावा असं आवाहन आयोगाने केलं आहे.
लॉकडाऊन आणि कोरोनामुळे निकाल केव्हा लागेल याबद्दल मुलांच्या मनात शंका होती. निकाल लागल्याने हजारो विद्यार्थ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
हे वाचा -
कोरोनाला हरवण्यासाठी खास डाएट प्लॅन; पोलीस कोरोनामुक्त झाल्याचा दावा
तुकाराम मुंढेंच्या मताविरोधात ठाकरे सरकारचा निर्णय, दिला 'हा' आदेश
संपादन - अजय कौटिकवार