JOIN US
मराठी बातम्या / देश / भारत करणार कोरोनावर मात! 1500 रुग्णांवर WHO करणार 'या' 3 औषधांचं ट्रायल

भारत करणार कोरोनावर मात! 1500 रुग्णांवर WHO करणार 'या' 3 औषधांचं ट्रायल

या सगळ्यात जागतिक आरोग्य संघटनाने (WHO) काही औषधांचे ट्रायल (तपासणी) करण्यास सुरुवात केली आहे. यातून हे औषध कितपत उपयोगी आहे, हे सिध्द केले जाणार आहे. आता भारतासाठी एक चांगली बातमी आली आहे.

जाहिरात

लस कुणाला मिळणार हे ठरवण्यासाठी आणि लसीकरणात प्राधान्य मिळणाऱ्यांच्या याद्या तयार करण्याचं काम सुरू झालं आहे. सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांना तसं कळवून त्यांच्याकडून यासंदर्भातला डेटाबेस मागवण्यात येणार आहे.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 14 मे: कोरोनाव्हायरसमुळे (Coronavirus) आतापर्यंत लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र आतापर्यंत कोणत्याही देशाला कोरोनावर लस किंवा ठोस उपाय शोधता आलेले नाही. जवळजवळ 100हून अधिक देश लस शोधण्यासाठी दिवसरात्र मेहनत करत आहेत. याशिवाय औषधांवरही युद्धपातळीवर काम सुरू आहे. मात्र कोणालाही यश आलेलं नाही. या सगळ्यात जागतिक आरोग्य संघटनाने (WHO) काही औषधांचे ट्रायल (तपासणी) करण्यास सुरुवात केली आहे. यातून हे औषध कितपत उपयोगी आहे, हे सिध्द केले जाणार आहे. आता भारतासाठी एक चांगली बातमी आली आहे. इंग्रजी वृत्तपत्र हिंदूस्थान टाइम्सनं दिलेल्या वृत्तानुसार, WHOच्या या ट्रायलमध्ये 1500 भारतीय कोरोना रुग्ण सामिल होणार आहेत. यामध्ये जगभरातील 100 देशांच्या रुग्णांचा समावेश आहे. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चनं (ICMR) ट्रायलसाठी रुग्णांची निवड करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत देशातील 9 रुग्णालयांची निवड करण्यात आली आहे. वाचा- BREAKING : कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी उद्धव ठाकरेंनी घेतला मोठा निर्णय या औषधांचे होणार ट्रायल ट्रायल दरम्यान रुग्णांना अँटी-व्हायरल औषधं दिली जातील. यात रेमेडीसवीर, क्लोरोक्विन / हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन, लोपीनावीर-रीटोनाविर या औषधांचा समावेश असणार आहे. चाचणी दरम्यान, यापैकी कोणत्याही औषधाचा कोरोनाच्या रूग्णवर परिणाम होत आहे की नाही याची तपासणी केली जाईल. सध्या ज्या रुग्णालयातील रूग्णांची निवड झाली आहेत ती जोधपूरमधील एम्स, चेन्नईतील अपोलो हॉस्पिटल, अहमदाबाद बीजे मेडिकल कॉलेज आणि सिव्हिल हॉस्पिटल आणि भोपाळातील चिरायू मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल आहेत. वाचा- …तर कोरोना कधीच नष्ट होणार नाही, WHOचा धक्कादायक खुलासा आणखी रुग्णांचा केला जाणार समावेश ICMR-नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूटच्या (NARI) डॉक्टर शीला गोडबोले यांनी याबाबत माहिती देताना, ‘सध्या आम्ही आकडेवारीचे पालन करीत आहोत, त्यामुळे ज्या ठिकाणी रुग्ण जास्त आहेत, तेथे चाचणी साइट्स असतील. यापूर्वी 9 रुग्णालयांना परवानगी देण्यात आली आहे. लवकरच आणखी 4 रुग्णालयांना ग्रीन सिग्नल देण्यात येईल. यामध्ये रुग्णांच्या संख्येवर कोणतेही बंधन नाही. आम्ही या प्रोग्राममध्ये आणखी रूग्णांचा समावेश करू शकतो. वाचा- येत्या 6 महिन्यात 5 लाख लोकांचा मृत्यू होणार, ‘हा’ आजार ठरणार कारण

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या