जिनिव्हा, 14 मे : चीनच्या वुहानपासून जगभरात जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून कोरोना पसरण्यास सुरुवात झाली. चार महिन्यांनंतरही कोरोनावर कोणतीही लस किंवा ठोस उपाय शोधता आलेला नाही आहे. यातच जागितक आरोग्य संघटनेने (WHO) काही दिवसांपूर्वी लवकरच कोरोनाची लस मिळेल, असे सांगत एक आशेचा किरण दाखवला. मात्र आता WHOने कोरोना कधीच नष्ट होणार नसल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे. WHOने स्पष्ट केले आहे की, असेही होऊ शकते की कोव्हिड-19 कधीच नष्ट होणार नाही. त्याच्यासोबत जगायची सवय लावून घ्यावी लागेल.
डब्ल्यूएचओचे आणीबाणीविषयक प्रकरणांचे संचालक मायकेल रायन यांनी बुधवारी जिनिव्हा येथील पत्रकार परिषदेत सांगितले की, "कोरोना व्हायरसमध्ये बदल होऊ शकतो, जो इतरांपेक्षा वेगळा आहे आणि कधीच संपू शकत नाही." एचआयव्हीचे उदाहरण देत ते म्हणाले की हा व्हायरसही संपलेला नाही आहे. मायकेल रायन यांच्या म्हणण्यानुसार लस नसल्यास सामान्य लोकांना रोगाविषयी योग्य प्रमाणात प्रतिकारशक्ती मिळण्यास अनेक वर्षे लागू शकतात.
वाचा-कोरोनाविरोधात हर्ड इम्युनिटी ठरू शकते जीवघेणी, WHO ने केलं सावध
Media briefing on #COVID19 with @DrTedros https://t.co/euggX435FQ
— World Health Organization (WHO) (@WHO) May 13, 2020
वाचा-अमेरिकेचा सर्वात मोठा खुलासा, चीन आणि WHOचा असा होता कोरोना संदर्भातला प्लॅन
लवकरच मिळणार कोरोनावर लस
इस्राइलनं दावा केला असला तरी, मानवावर या लसीची चाचणी करण्यात आलेली नाही. या सगळ्यात आता कोरोनाव्हायरस संसर्गाची लस लवकरच मिळणार असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) महासंचालक टेड्रॉस अॅडॅनॉम यांनी संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेला दिली. यावेळी त्यांनी लवकरच कोरोनावर लस मिळेल असंही सांगितलं. टेड्रॉस यांनी सांगितलं की, सध्या एकूण 7 ते 8 टीम ही लस तयार करण्याच्या अगदी जवळ आहे आणि लवकरच जगाला एक चांगली बातमी मिळेल. टेड्रॉस यांच्या म्हणण्यानुसार बर्याच देशांनी मदतीचा हात पुढे केला आहे आणि सुमारे 100 वेगवेगळ्या टीम लसीची चाचणी घेत आहेत आणि त्यातील 8 लसीचा शोध घेण्याच्या अगदी जवळ आले आहेत.
वाचा-कोरोनाला हरवणं शक्य! येत्या काही महिन्यात लस मिळण्याची शक्यता, WHOनं दिले संकेत
प्राण्यांवर चाचणी करण्यास सुरुवात
टेड्रॉस यांनी असेही सांगितले की, गेल्या जानेवारीपासून जगभरातील हजारो संशोधकांसोबत काम सुरू आहे. बहुतेक लस प्राण्यांवर वापरण्यास सुरवात करतात, तर काहींनी मानवी चाचण्या देखील सुरू केल्या आहेत. सुमारे 400 शास्त्रज्ञांची एक टीम या संपूर्ण कामावर नजर ठेवून आहे. टेड्रॉस म्हणाले की कोरोना संसर्ग खूप धोकादायक आहे आणि लसीशिवाय आपणया लढाईत अगदी कमकुवत स्थितीत असू. ते म्हणाले की, कोरोनानं सर्व देशांना शिकवले की, प्रत्येक देशाला मजबूत आरोग्य सेवा आवश्यक आहे.