• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • BREAKING : कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी उद्धव ठाकरेंनी घेतला मोठा निर्णय

BREAKING : कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी उद्धव ठाकरेंनी घेतला मोठा निर्णय

ही औषध महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्यासाठी ही टास्कफोर्स काम करणार आहे,

  • Share this:
मुंबई, 14 मे : महाराष्ट्रापुढे कोरोना व्हायरसचे संकट उभे ठाकले आहे. कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी डॉक्टर, आरोग्य कर्मचारी जीवाची बाजी लावून लढा देत आहे. राज्य सरकारकडूनही वेळोवेळी नवनवीन बदल केले जात आहे. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाबाधित रुग्णावर उपचारासाठी मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांवर आता आयुर्वेदिक उपचार केले जाणार आहे.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासाठी एक आयुर्वेदिक डॉक्टरांची टास्क फोर्स तयार केली आहे. या टीममध्ये  माजी महापौर शुभा राऊळ आणि इतरही आयुर्वेदिक डॉक्टरांचा समावेश असणार आहे. ही डॉक्टरांची टीम डॉ. तात्याराव लहाने यांच्या अंतर्गत काम करणार आहे. हेही वाचा - मुंबईच्या या भागातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी, BMC ने घेतला निर्णय राज्यभरात कशा पद्धतीने रुग्णांवर आयुर्वेदिक उपचार केले पाहिजे,  या संदर्भात ही  टास्कफोर्स एक नियमावली ठरवणार आहे. तसंच, रुग्णांना कोण कोणते आयुर्वेदिक औषध वापरले पाहिजे आणि ती औषध महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्यासाठी ही टास्कफोर्स काम करणार आहे, अशी माहिती मिळाली आहे. महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. त्यातच मुंबई आणि पुण्यात कोरोनाबाधित रुग्ण सर्वात जास्त आहे. कोरोनावर मात करण्यासाठी राज्य सरकारकडून अनेक प्रयत्न सुरू आहे. याआधीही लीलावती हॉस्पिटलमध्ये कोरोनाबाधित रुग्णावर प्लाझ्मा थेरपीचा वापर करण्यात आला होता. सुरूवातील एका रुग्णावर हा प्रयोग यशस्वीही झाला होता. पण, उपचारादरम्यान या रुग्णाचा मृत्यू झाला. कोरोनाबाधित रुग्णावर प्लाझ्मा थेरपीचा वापर व्हावा अशी केंद्र सरकारकडून मान्यता मिळाली आहे. हेही वाचा - Lockdown : दोन महिन्यांनी दुकान उघडताच बसला धक्का, अशी झाली होती अवस्था
Published by:sachin Salve
First published: