• Home
 • »
 • News
 • »
 • videsh
 • »
 • येत्या 6 महिन्यात 5 लाख लोकांचा मृत्यू होणार, कोरोना नाही तर 'हा' आजार ठरणार कारण

येत्या 6 महिन्यात 5 लाख लोकांचा मृत्यू होणार, कोरोना नाही तर 'हा' आजार ठरणार कारण

यासगळ्यात आता येत्या 6 महिन्यात तब्बल 5 लाख लोकांचा मृत्यू होणार असल्याचे एक अभ्यासातून समोर आलं आहे.

 • Share this:
  जिनिव्हा, 14 मे : कोरोनाव्हायरसनं जगभरात थैमान घातले आहे. या व्हायरसमुळे आतापर्यंत 2.97 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 43.45 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. 4 महिन्यांपासून सर्व देश कोरोनावर लस शोधण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र अद्याप कोणालाही यश आलेले नाही आहे. यासगळ्यात आता येत्या 6 महिन्यात तब्बल 5 लाख लोकांचा मृत्यू होणार असल्याचे एक अभ्यासातून समोर आलं आहे. मात्र हे मृत्यू कोरोनामुळे नाही तर एड्समुळे होणार आहेत. जागतिक आरोग्य संस्था (WHO) नं केलेल्या मॉडेलिंग अभ्यासानुसार, आणि यूएनएड्सचा (UNAIDS) अंदाजावरून पुढील 6 महिन्यांत आफ्रिकेच्या उप-सहारान भागात एड्समुळे 5 लाख लोकांचा मृत्यू होईल. असे झाल्यास, 2008मध्ये एड्समुळे मरण पावलेल्यांचा हा विक्रम तुटेल. 2010पासून आफ्रिकेत HIV संसर्गाचे प्रमाण 43 टक्क्यांनी कमी झाले आहे. हे अँटीरेट्रोव्हायरल (ARV) थेरपीमुळे घडलx आहे. मात्र जर त्यांना योग्य वेळी औषध आणि थेरपी मिळाली नाही तर मोझांबिकमध्ये पुढील सहा महिन्यांत 37 टक्के रुग्णांची संख्या वाढेल. मलावी आणि झिम्बाब्वेमध्ये 78-78 टक्के आणि युगांडाच्या 104 टक्के मुलांना HIV ची लागण होऊ शकते. वाचा-Lockdown : दोन महिन्यांनी दुकान उघडताच बसला धक्का, अशी झाली होती अवस्था वाचा-...तर कोरोना कधीच नष्ट होणार नाही, WHOचा धक्कादायक खुलासा WHO आणि UNAIDS यांनी त्यांच्या अभ्यासानुसार असे सांगितले आहे की, सन 2018 मध्ये 2.5 कोटी लोकांना HIV झाला होता. त्यापैकी 64 टक्के अँटीरेट्रोव्हायरस (ARV) थेरपीच्या सहाय्याने बरे झाले. हा रिपोर्ट द टेलीग्राफमध्ये प्रसिद्ध करण्यात आला आहे. मात्र आता कोरोनाचा प्रसार वाढल्यानंतर आरोग्य व्यवस्था खालावली आहे. HIV क्लिनिकमध्ये ARV पुरविल्या जात नाहीत. वाचा-कोरोना लॉकडाऊनच्या काळात ग्रामीण भागातून अंगावर शहारा आणणारी माहिती समोर WHOने म्हटले आहे की पृथ्वीवरील एड्स, टीबी, मलेरिया यासारख्या इतर आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांसाठी कोरोना विषाणू किती धोकादायक आहे, हे या अभ्यासातून दिसून येते. अशा आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांमध्ये कोरोनाचा त्रास होऊ शकत नाही परंतु त्यांना कोणत्या ना कोणत्या मार्गाने जास्त समस्या भेडसावतात. WHOचे महासंचालक डॉ. टेड्रॉस अॅडॅनॉम घेबेरेसस यांनी हा अहवाल विचित्र परिस्थिती निर्माण करीत असल्याची खंत व्यक्त केली. जर आफ्रिकेत एड्स संबंधित आजारामुळे 5 लाख लोक मरण पावले तर हे भयंकर आहे. वाचा-कोरोनाच्या दहशतीत भारताला दिलासा! चार दशकांत जे झालं नाही ते आता घडलं आफ्रिकेत HIV पसरण्याचा धोकाही वाढला आहे, कारण तेथे कंडोमची कमतरता आहे. याशिवाय एआरव्ही थेरपी, टेस्टिंग किट इत्यादींचीही कमतरता आहे. आफ्रिकेत एड्स किंवा एचआयव्ही ग्रस्त लोकांना वेळेवर एआरव्ही थेरपी घ्यावी लागते.
  Published by:Priyanka Gawde
  First published: