JOIN US
मराठी बातम्या / देश / IAS अधिकारी ते सोशल मीडिया स्टार; प्रेमात झाली फसवणूक, अभिषेक सिंहची लव्ह स्टोरी चर्चेत

IAS अधिकारी ते सोशल मीडिया स्टार; प्रेमात झाली फसवणूक, अभिषेक सिंहची लव्ह स्टोरी चर्चेत

आयएएस अभिषेक सिंह यांची लव्ह स्टोरी खूप फिल्मी आहे. कॉलेजच्या दिवसात ते एका मुलीवर खूप प्रेम करायचे.

जाहिरात

IAS Abhishek Singh

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई,  09 फेब्रुवारी :   सनदी अधिकारी अभिषेक सिंह पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. योगी सरकारच्या सूचनेवरून त्यांना निलंबित करण्यात आलं आहे. आयएएस असण्यासोबत अभिषेक सिंह एक अभिनेता आणि मॉडेलदेखील आहेत. त्यांची लव्ह स्टोरीही खूप फिल्मी आहे. आयएएस अभिषेक सिंह उत्तर प्रदेशातल्या जोनपूरचे रहिवासी आहेत. अभिषेक सिंह हे केवळ सरकारी नोकरीमुळे चर्चेत नसतात. ते अभिनय आणि मॉडेलिंगदेखील करतात. सध्या आयएएस अभिषेक सिंह यांना निलंबित करण्यात आलं आहे. गुजरात निवडणुकीदरम्यान त्यांनी कारसोबत फोटो शेअर केल्यामुळे त्यांना निरीक्षक पदावरून हटवण्यात आलं होतं. तेव्हापासून ते रजा न घेता बेपत्ता झाले आहेत. आता योगी सरकारने त्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावून निलंबित केलं आहे. आयएएस अभिषेक सिंह यांची लव्ह स्टोरी खूप फिल्मी आहे. कॉलेजच्या दिवसात ते एका मुलीवर खूप प्रेम करायचे; मात्र तिने धोका दिल्याने त्यांच्या मनात आत्महत्या करण्याचा विचार आला होता. अशा वाईट प्रसंगातून गेल्यानंतर त्यांनी स्वतःला सावरत यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. ते 2011च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. नागरी सेवेत रुजू झाल्यानंतरही त्यांची संगीत आणि अभिनयाची आवड कायम होती. हेही वाचा - IAS Arpit Gupta : अनेकांनी मारले टोमणे, भावालाही गमावलं पण तो खचला नाही, शेवटी करुन दाखवलं! आयएएस अभिषेक सिंह आणि आयएएस दुर्गाशक्ती नागपाल यांची 2009मध्ये यूपीएससी परीक्षेची तयारी करत असताना भेट झाली. माध्यमातल्या वृत्तानुसार, हे दोघं 2012मध्ये विवाहबद्ध झाले. दुर्गाशक्ती नागपाल या खूप लोकप्रिय आयएएस अधिकारी आहेत. अभिषेक सिंह यांचे वडील निवृत्त आयपीएस अधिकारी आहेत. अभिषेक यांना लहानपणापासून पोलीस खात्याचं विशेष आकर्षण होते; पण वडिलांच्या सल्ल्यानुसार त्यांनी आयएएसची तयारी सुरू केली. आयएएस अभिषेक सिंह ग्लॅमर इंडस्ट्रीतला एक लोकप्रिय चेहरा आहेत. त्यांना मॉडेलिंग आणि अभिनयाची विशेष आवड आहे. जुबीन नौटियालच्या एका म्युझिक अल्बममध्ये त्यांनी अभिनय केला आहे. याशिवाय आयएएस अभिषेक सिंह यांनी नेटफ्लिक्सवर रिलीज झालेल्या ‘दिल्ली क्राइम’ या वेबसीरिजच्या दुसऱ्या सीझनमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे.

 आयएएस अभिषेक आणि दुर्गाशक्ती नागपाल या दांपत्याला दोन मुली आहेत. इन्स्टाग्रामवर अभिषेक यांचे 30 लाख फॉलोअर्स आहेत. त्यांच्या निलंबनाची बातमी समजल्यापासून चाहते त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्टवर सातत्याने कमेंट्स करत आहेत. लोक त्यांना ब्रँड असं म्हणू लागले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या