JOIN US
मराठी बातम्या / देश / गर्दीतही शोधून काढणार कोरोना रुग्ण; IIT च्या माजी विद्यार्थ्यांनी तयार केलं खास उपकरण

गर्दीतही शोधून काढणार कोरोना रुग्ण; IIT च्या माजी विद्यार्थ्यांनी तयार केलं खास उपकरण

देश अनलॉक झाल्याने कोरोनाव्हायरसवर नियंत्रण ठेवण्यासाठी या उपकरणाची मदत होईल.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

हैदराबाद, 09 जून : कोरोना लॉकडाऊननंतर (lockdown) देश आता हळूहळू अनलॉक (unlock) होऊ लागला आहे. कित्येक दिवस घरात बंदिस्त असलेली लोकं आता बाहेर पडू लागली आहे. अनेक ठिकाणी गर्दी होत असल्याचं दिसून आलं. त्यात अनेक रुग्णांमध्ये कोरोनाव्हायरसची लक्षणं दिसत नाही. त्यामुळे आता अशा परिस्थिती कोरोनाव्हायरसवर नियंत्रण ठेवणं म्हणजे एक आव्हानच आहे. मात्र यावर मार्ग शोधून काढला आहे तो आयआयटीच्या माजी विद्यार्थ्यांनी. त्यांनी एक असा विशेष ड्रोन (special drone) तयार केला आहे, जो गर्दीतही कोरोना रुग्णाला शोधून काढेल. हैदराबादमधील (Hyderabad) आयआयटीच्या माजी विद्यार्थ्यांनी इन्फ्रारेड कॅमेरा असलेला ड्रोन तयार केला आहे. हा ड्रोन गर्दीच्या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीच्या शरीराच्या तापमान तपासेल. ज्याच्या शरीराचं तापमान जास्त असेल त्याची ओळख पटवण्यात हा ड्रोन सक्षम आहे. या ड्रोनमध्ये एक लाऊडस्पीकरही लावण्यात आला आहे. ज्यामार्फत ज्या व्यक्तीचं शरीराचं तापमान जास्त आहे, त्या व्यक्तीला थांबवण्याची किंवा गर्दीतून बाजूला होण्याची सूचना देता येऊ शकते. हे वाचा -  कोरोनाविरोधी भारतीयांना मिळाली ताकद; 30% संक्रमित उपचारविनाच बरे झाले? थर्मल स्क्रिनिंगसाठी (thermal screenig) एअरबोर्न इन्फ्रारेड कॅमेऱ्याची विविध प्रकारे चाचणी घेण्यात आली आणि ती यशस्वी ठरल्याचं कंपनीने सांगितलं. मारुत ड्रोनचे सीईओ प्रेम कुमार विशालावथ यांनी सांगितलं, या ड्रोनमार्फत होणाऱ्या थर्मल स्क्रिनिंगचा फायदा म्हणजे एका-एका व्यक्तीची तपासणी करण्याची गरज नाही. गर्दीतही ताप असलेल्या व्यक्तीला ओळखून त्याची कोरोना टेस्ट करता येऊ शकते.  या ड्रोनची चाचणी घेण्यात आली, त्यात हे ड्रोन यशस्वी ठरलं आहे. हे वाचा -  UNLOCK : मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पालिकेकडून सुधारीत नियमावली जाहीर लॉकडाऊनमध्ये हैदराबाद आणि करीमनगर पोलिसांनी या ड्रोनचा वापर केला होता. अनलॉकच्या कालावधीतही कोविड-19 वर नियंत्रण ठेवण्यात एयरबोर्न थर्मल स्क्रिंनिंगची मदत होईल असा दावा कंपनीने केला आहे. संपादन - प्रिया लाड हे वाचा -  कृत्रिम फुफ्फुसांवर कोरोनाला हरवलं; ECMO वर जगणारी देशातील पहिली कोरोना रुग्ण घरच्या घरी मोज्यांपासूनही बनवू शकता मास्क, VIDEO पाहा

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या