कृत्रिम फुफ्फुसांवर राहून कोरोनाला हरवलं; ECMO वर जगणारी देशातील पहिली कोरोना रुग्ण

कृत्रिम फुफ्फुसांवर राहून कोरोनाला हरवलं; ECMO वर जगणारी देशातील पहिली कोरोना रुग्ण

ECMO सपोर्टवर ठेवण्यात आलेल्या तीन कोरोना रुग्णांचा याआधी मृत्यू झाला आहे, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.

  • Share this:

कोलकाता, 09 जून : कोरोनाव्हायरसची (coronavirus) लागण झालेल्या रुग्णांना श्वास घ्यायला त्रास होतो. अशावेळी त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवलं जातं. व्हेंटिलेटवरही त्या रुग्णाची प्रकृती सुधारत नसेल तर त्याला ईसीएमओ म्हणजेच एक्स्ट्राकॉर्पोरल मेम्ब्रेन ऑक्सिजनेशनवर (Extracorporeal membrane oxygenation - ECMO ) ठेवण्याशिवाय पर्याय नसतो. भारतात आतापर्यंत ईसीएमओवर ठेवलेल्या काही कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मात्र एका कोरोनाग्रस्त महिलेनं ECMO वर राहून जगून दाखवलं आहे आणि ECMO वर राहून कोरोनावर मात करणारी ती देशातील पहिली कोरोना रुग्ण ठरली आहे.

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, कोलकात्यातील (Kolkata) कालिघाट परिसरात राहणाऱ्या 24 वर्षीय महिलेला कोरोनाव्हायरसची लागण झाली होती. तिला ताप होता आणि श्वास घ्यायला खूप त्रास होता. या महिलेला 17 मे रोजी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ही महिला खूप लठ्ठ होती, तिचं वजन जवळपास 100 किलो होतं. त्यामुळे तिची प्रकृती खूप गंभीर झाली होती.

हे वाचा - आता सॅनिटायझरप्रमाणे Mouthwash देखील कोरोनाव्हायरसपासून करणार बचाव

रुग्णालय प्रशासनानं सांगितलं, या महिलेला श्वास घ्यायला इतका त्रास होत होता की सुरुवातीला तिला वेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. मात्र तरी तिच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. त्यामुळे मग ECMO हा शेवटचा पर्याय होता. 12 दिवस या महिलेला एक्स्ट्राकॉर्पोरल मेम्ब्रेन ऑक्सिजनेशनवर ठेवण्यात आलं. हे एक प्रकारचं कृत्रिम फुफ्फुस असतं. यात शरीरातलं रक्त बाहेर काढून ते ऑक्सिजनेट करून म्हणजे त्याला ऑक्सिजन पुरवून ते पुन्हा शरीरात पाठवलं जातं.

हे वाचा - कोरोनामुळे शिवसेना नगरसेवकाचं निधन, ठाण्यातील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

याआधी नवी दिल्ली आणि चेन्नईमध्ये तीन कोरोना रुग्णांना ECMO वर ठेवण्यात आलं, त्यांचा मृत्यू झाला. मात्र या महिलेने ECMO वर राहून कोरोनावर मात केली आणि ECMO वर राहून कोरोनाला हरवणारी देशातील ती पहिली कोरोना रुग्ण ठरली आहे, अशी माहिती रुग्णालय प्रशासनानं दिली.

संपादन - प्रिया लाड

हे वाचा - कोरोनावर आणखी एक प्रभावी औषध, 3 दिवसांतच रुग्णांना आराम; शास्त्रज्ञांचा दावा

घरच्या घरी मोज्यांपासूनही बनवू शकता मास्क, VIDEO पाहा

First published: June 9, 2020, 2:55 PM IST

ताज्या बातम्या