UNLOCK : मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पालिकेकडून सुधारीत नियमावली जाहीर

UNLOCK : मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पालिकेकडून सुधारीत नियमावली जाहीर

लॉकडाउनमुळे ठप्प झालेली मुंबईनगरी लॉकडाउनच्या पाचव्या टप्प्यात हळूहळू पूर्वपदावर येत आहे.

  • Share this:

मुंबई, 09 जून : गेल्या अडीच महिन्यापासून लॉकडाउनमुळे ठप्प झालेली मुंबईनगरी लॉकडाउनच्या पाचव्या टप्प्यात हळूहळू पूर्वपदावर येत आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या सुचनेनंतर अनेक अटी शिथिल करण्यात आल्या आहे. मुंबईतील लॉकडाउनबाबत पालिकेकडून आणखी अटी शिथिल करण्यात आल्या आहेत.

मिशन बिगेन अगेन म्हणत राज्य सरकारने लॉकडाउनमधून बाहेर पडण्यासाठी 2 जून रोजी नियामवली प्रसिद्ध केली होती. याच नियमावलीनुसार मुंबई महापालिकेकडून सुधारीत परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.  या सुधारीत पत्रकानुसार, मुंबईतील दुकानं उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. परंतु, एका दिवसात एकाच लेनची दुकानं उघडता येणार आहे.   सोमवार ते शनिवारपर्यंत दुकानं उघडता येतील, रविवारी दुकानं बंद ठेवावी लागणार आहे.

मुंबई पालिकेच्या सुधारीत पत्रकातील प्रमुख मुद्दे

- खेळाच्या मैदानांवरील झुला किवा इतर खेळाच्या साहित्याचा वापर करता येणार नाही, ओपन एअर जिमच्या साहित्याचा वापरावर निर्बंध

- दुकानं उघडली जातील, पण रस्त्याच्या एका बाजूची दुकान उघडी ठेवली तर दुसऱ्या बाजूकडील दुकानं बंद ठेवली जावी

- दुकाने पूर्णवेळ(साधारणपणे जितका वेळ असतात) उघडी राहतील

- दुकाने सोमवार ते शनिवार उघडी राहणार तर  रविवारी बंद राहतील

- वृत्तपत्रांची घरी डिलिव्हरी करण्यासाठी मुभा, पण मास्क आणि इतर सुरक्षेच्या उपाययोजनांच पालन करावे लागेल

- शैक्षणिक संस्था जसे कॉलेज, विद्यापीठ, शाळामधील कर्मचारी वर्ग आणि शिक्षकांना कामावर जाता येईल पण शिकवण्याच्या कामाव्यरिक्त इतर कामांसाठी

- मुंबईच्या उपनगरातील एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात  ये जा करणाऱ्या मजूर, नोकरदारांना कोणत्याही परवानगी आवश्यकता भासणार नाही

संपादन - सचिन साळवे

First published: June 9, 2020, 4:02 PM IST
Tags:

ताज्या बातम्या