कोरोनाविरोधात भारतीयांना मिळाली ताकद; हॉटस्पॉटमधील 30% संक्रमित उपचाराविनाच बरे झाले?

कोरोनाविरोधात भारतीयांना मिळाली ताकद; हॉटस्पॉटमधील 30% संक्रमित उपचाराविनाच बरे झाले?

या 30 टक्के लोकांच्या शरीरात कोरोनाव्हायरसविरोधातील अँटिबॉडीज सापडल्यात.

  • Share this:

नवी दिल्ली, 09 मे : भारतात (India) कोरोनाव्हायरसची (coronavirus) प्रकरणं दिवसेंदिवस वाढतच आहे. सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या देशांच्या यादीत भारत पाचव्या स्थानी आहे. अशात आता एक दिलासादायक बातमी म्हणजे देशात कोरोना हॉटस्पॉट असलेल्या भागातील 30% लोकांना कोरोनाव्हायरसची लागण होऊन ते उपचाराविनाच बरे झाले असावेत. इंडियन काऊन्सिल मेडिकल रिसर्चच्या (ICMR) सेरो सर्वेक्षणात (sero-survey) ही बाब समोर आली आहे.

हा सर्व्हे अद्याप प्रसिद्ध झाला नाही. मात्र न्यू इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार आयसीएमआर, नेशनल सेंटर फॉर डिजीज कंट्रोल (NCDC), राज्य सरकार आणि जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) एकत्रितरित्या सेरोसर्व्हे केला. या अंतर्गत देशातील 70 जिल्ह्यांतील 24 हजार सॅम्पल घेण्यात आले. या सर्वेक्षणानुसार कंटेनमेंट झोनमध्ये 15-30 टक्के लोकं कोरोना संक्रमित झाले आणि ते उपचार न घेताच बरे झालेत, अशी माहिती सरकारच्या सूत्रांनी दिली.

हे वाचा - कृत्रिम फुफ्फुसांवर कोरोनाला हरवलं; ECMO वर जगणारी देशातील पहिली कोरोना रुग्ण

सेरोसर्व्हे अहवालाबाबत न्यूज 18 ला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाव्हायरसचे हॉटस्पॉट असलेल्या भागांपैकी मुंबई, पुणे, दिल्ली, अहमदाबाद आणि इंदोरमध्ये सर्वात जास्त प्रकरणं आहे.

या लोकांमध्ये हर्ड इम्युनिटी म्हणजे सामूहिक रोगप्रतिकारक क्षमता विकसित होते आहे का? याबाबत अद्याप काही सांगू शकत नाही. मात्र या भागातील लोकांमध्ये कोरोनाविरोधात रोगप्रतिकारक शक्ती वाढते आहे. याचा अर्थ या भागात सर्वात आधी हर्ड इम्युनिटी विकसित होऊ शकते पण त्याला वेळ लागेल, असं या सर्वेक्षणात दिसून येतं.

हे वाचा - भारताबाबत वैज्ञानिकाचा दावा ठरतोय खरा, जुलैमधील रुग्णसंख्या चिंता वाढवणारी

देशातील कित्येक लोकं कोरोनाव्हायरसने संक्रमित आहेत, मात्र त्यांच्यामध्ये लक्षणं दिसत नाहीत. म्हणजेच भारतातील कोरोना रुग्णांची संख्या जास्त असू शकते, अशी शक्यताही या अहवालातून वर्तवण्यात येते.

काय आहे सेरो सर्व्हे

यामध्ये एका विशिष्ट भागातील जास्तीत जास्त लोकांचे ब्लड सीरम टेस्ट केल्या जातात. सामान्यपणे हे जिल्हा स्तरावर केलं जातं. या टेस्टमुळे शरीरातील अँटिबॉडीजबाबत माहिती मिळते, ज्यामुळे किती लोकांना कोरोनाव्हायरसची लागण झाली होती, संक्रमण किती प्रमाणात पसरलं आहे याची माहिती मिळते.

संकलन, संपादन - प्रिया लाड

हे वाचा - 94 वर्षीय कवी गुलजार देहलवी यांची कोरोनावर मात, कलेक्टर म्हणाले...

First published: June 9, 2020, 4:33 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading