JOIN US
मराठी बातम्या / देश / जन्मोजन्मीचं वचन एका झटक्यात तुटलं! बायकोला बॉयफ्रेंडसोबत हॉटेलवर पाहिलं, पुढे...

जन्मोजन्मीचं वचन एका झटक्यात तुटलं! बायकोला बॉयफ्रेंडसोबत हॉटेलवर पाहिलं, पुढे...

मग काय…त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली आणि त्याने तिथेच बायकोच्या बॉयफ्रेंडची धुलाई केली.

जाहिरात

त्याने तिच्या प्रत्येक हालचालीवर बारीक नजर ठेवायला सुरुवात केली. एके दिवशी...

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

आग्रा, 26 जून : आपल्या बायकोचं बाहेर काहीतरी सुरू आहे, असा विचारही एखाद्या पुरुषाला सहन होत नाही. उत्तर प्रदेशातील एका नवऱ्याने तर त्याच्या बायकोला चक्क हॉटेलच्या रूममध्ये परपुरुषासोबत पाहिलं. मग काय…त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली आणि त्याने तिथेच बायकोच्या बॉयफ्रेंडची धुलाई केली. आग्र्यातील ट्रान्स यमुना भागात हा प्रकार घडला. सदर नवऱ्याला आपल्या बायकोच्या हालचाली काहीशा बदललेल्या वाटत होत्या. तिचं बाहेर काहीतरी सुरू आहे असा संशय दिवसेंदिवस बळावत होता. मग त्याने तिच्या प्रत्येक हालचालीवर बारीक नजर ठेवायला सुरुवात केली. एके दिवशी बायकोचं इतर कोणाशीतरी प्रेमप्रकरण सुरू आहे, अशी त्याला पक्की माहिती मिळाली. तेव्हाच तो रागाने लालबुंद झाला. मात्र तिला आता रंगेहाथ पकडायचं असं त्याने ठरवलं. तशी संधीही त्याला मिळाली. बायको तिच्या प्रियकरासोबत हॉटेलमध्ये असल्याचं कळलं. मग जराही उशीर न करता तोदेखील हॉटेलवर जायला निघाला.

ज्या खोलीत त्याची बायको प्रियकरासोबत प्रेम रंगी रंगली होती त्या खोलीचा दरवाजा त्याने जोरजोरात ठोठावला. भर प्रेमात कोण घुटमळतंय असा रागा-रागात दोघांनी दरवाजा उघडला आणि समोर नवऱ्याला बघून दोघांनाही जणू दिवसा तारे दिसू लागले. तर बायकोला परपुरुषासोबत नको त्या अवस्थेत पाहून नवऱ्याचा पारा प्रचंड चढला. त्याने थेट खोलीत शिरून बायकोच्या प्रियकराला मारहाण करायला सुरुवात केली. भांडण एवढं टोकाला पोहोचलं की पोलिसांना मध्ये पडावं लागलं. पोलिसांनी दोघांनाही ठाण्यात नेलं. 4 वर्षातच मोडला पहिला संसार, घटस्फोटाच्या दुःखातून सावरत अभिनेत्री बांधणार लग्नगाठ; म्हणाली… इथे प्रियकर जरा बाजूला झाला आणि नवऱ्या-बायकोचं भांडण चव्हाट्यावर आलं. दोघांच्याही कुटुंबियांना पोलिसांनी बोलवून घेतलं. घडलेला प्रकार ऐकून दोन्ही कुटुंबियांना धक्काच बसला. तरीही त्यांनी आपापली बाजू सावरण्याचा प्रयत्न केला, एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले. थोड्या वेळाने हे भांडण अगदी नळावरचं वाटू लागलं. मग पोलिसांनी सर्वांना आपापल्या घरी रवाना केलं. शिवाय कोणीच याबाबत काही रीतसर तक्रार दिलेली नसल्याने कोणतीही कारवाई करता येणार नाही, असं पोलिसांनी सांगितलं. दरम्यान, आता या नवऱ्याने मला ही बायको नकोच. मला तिच्यासोबत राहायचंच नाहीये, असा हट्ट धरला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या