प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री वाहबिझ दोराबजीचे वैवाहिक जीवन अडचणींनी भरलेले होते, लवकरच ती या बंधनातून मुक्त झाली. तरी आजही तिचा लग्न संस्थेवर विश्वास आहे. तिला आयुष्याला दुसरी संधी द्यायची आहे.
वाहबिझ दोराबजीला तिच्या पतीपासून घटस्फोटानंतर नवीन आशेनं जीवन जगायचं आहे. तिला आयुष्यभर जुन्या गोष्टी सांभाळत बसायचं नाही. तिला एक पाऊल पुढे टाकायचे आहे आणि त्यासाठी तिने तयारीही केली आहे.
वाहबिझ ने पुन्हा लग्न करण्यास होकार दिला आहे. तिने स्वतः ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. अभिनेत्रीने हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, जर तुमच्या आयुष्यात एखादी घटना तुमच्या मनाविरुद्ध घडली तर याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्या प्रेमास पात्रच नाही. ,
घटस्फोटानंतरही वाहबीजचा विवाह संस्थेवर अजूनही विश्वास आहे. याविषयी ती म्हणाली, 'नक्कीच, मी दुसरं लग्न करणार आहे आणि ते लवकरच होणार आहे, याविषयी आत्ताच काही सांगता येणार नाही.'
वाहबिझ म्हणाली, 'मी प्रेमाला आयुष्यात दुसरी संधी दिली आहे. हा माझा हक्क आहे.' 2013 मध्ये तिने अभिनेता विवियन डिसेनासोबत लग्नगाठ बांधली. ते लग्नानंतर 4 वर्षांतच वेगळे झाले, परंतु घटस्फोट त्यांच्यासाठी खूप वेदनादायक होता.
घटस्फोटानंतर वाहबिझ खूपच दुखावली होती. तिने स्वतःला कठीण परिस्थितीतून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला, ज्यामध्ये तिचे मित्र आणि कुटुंबीयांनी खूप मदत केली.
37 वर्षीय वाहबिजने 'प्यार की ये एक कहानी' आणि 'बहू हमारी रजनी कांत' सारख्या टीव्ही शोमध्ये काम केले आहे. 'हिकअप्स अँड हुकअप्स' या वेब सीरिजमध्येही ती दिसली आहे.