JOIN US
मराठी बातम्या / देश / लग्नानंतरही बॉयफ्रेंडच्या संपर्कात, पतीला झालं माहित अन्...

लग्नानंतरही बॉयफ्रेंडच्या संपर्कात, पतीला झालं माहित अन्...

पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याची माहिती पतीला माहिती झाली होती.

जाहिरात

प्रतिकात्मक फोटो

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

ग्वाल्हेर, 2 एप्रिल : देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना समोर येत आहेत. बलात्कार, आत्महत्या तसेच अनैतिक संबंधातून हत्या यांसारखे प्रकार सातत्याने समोर येत आहेत. विवाहबाह्य संबंधांतून खुनाच्याही घटना घडत असल्याचे दिसत आहेत. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

एका तरुणाला आपल्या पत्नीच्या प्रियकराची माहिती मिळताच त्याचा संयम सुटला. यानंतर त्याने पत्नीच्या प्रियकरावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात हा तरुण गंभीर जखमी झाला. यानंतर या तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना शनिवारी पहाटे मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये आंतरी पोलीस ठाण्याच्या कल्याणी गावात घडली. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई केली आहे. पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. आंतरी पोलीस ठाण्याच्या कल्याणी गावातील रहिवासी असलेल्या मोनू गौर जखमी अवस्थेत पोलीस ठाण्यात पोहोचला. यावेळी मोनूने सांगितले की, गावात राहणाऱ्या हेमंत कुशवाहने त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला. तो घरी झोपला होता, त्याचवेळी हेमंत आला आणि त्याने मोनूच्या गळ्यावर चाकूने वार केले. यानंतर पोलिसांनी जखमी मोनूला उपचारासाठी रुग्णालयात पाठवले. यानंतर आंतरी पोलीस ठाण्याचे प्रभारी दीपक सिंह यांनी पथकासह कल्याणी गावात छापा टाकून आरोपी हेमंतला पकडले. एकासोबत अफेअर, कालांतराने दुसऱ्याकडे झुकला कल, शेवटी घडलं भयानक आंतरी पोलिसांनी आरोपी हेमंतविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. प्रेमप्रकरणातून आरोपीने हल्ला केल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या