बस्ती, 2 एप्रिल : देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना समोर येत आहेत. बलात्कार, आत्महत्या तसेच अनैतिक संबंधातून हत्या यांसारखे प्रकार सातत्याने समोर येत आहेत. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नव्या प्रेमात एक्स बॉयफ्रेंड अडथळा बनत होता. त्यामुळे गर्लफ्रेंडने त्याची हत्या केली. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण -
उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यातील डुबौलिया पोलीस ठाण्याच्या कंघुसरा गावात गावाजवळील कालव्यात एका तरुणाचा मृतदेह सापडला होता. 29 मार्च रोजी ही घटना घडली. मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करून शोध सुरू केला. हा विकास चौधरी नावाच्या तरुणाचा मृतदेह असल्याची माहिती यादरम्यान समोर आली. यानंतर शनिवारी पोलिसांनी या घटनेचा धक्कादायक खुलासा केला.
मृत विकासचे गावातीलच एका तरुणीसोबत अनेक दिवसांपासून प्रेमसंबंध होते. दोघांचे प्रेम फुलू लागले. मात्र, यानंतर दोघांमध्ये काही बिनसायला सुरुवात झाली. दोघांमध्ये होत असलेल्या मतभेदाचा एका तरुणाने फायदा घेतला. कुलवेंद्र असे या प्रियकराचे नाव आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत तरुणीचा कल दुसऱ्या तरुणाकडे म्हणजे कुलवेंद्रकडे अधिक वाढला. त्यामुळे या तरुणीने पहिल्या प्रियकराला भेटणे बंद केले. मात्र, त्यानंतर विकासने तरुणीला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. विकासने यापूर्वीही तरुणीचे अश्लील व्हिडिओ, फोटो आणि ऑडिओ क्लिप बनवले होते.
दोन भावांना मित्राच्या वाढदिवसाची पार्टी ठरली अखेरची, समोरून रेल्वे आली अन्…
तरुणीला तिच्या दुसऱ्या बॉयफ्रेंडसह अटक -
एएसपी दीपेंद्र चौधरी यांनी सांगितले की, 29 मार्चला तरुणाचा मृतदेह मिळाल्यानंतर त्याचे शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून एक मुलगी आणि एका अज्ञाताला अटक करण्यात आली. त्यांची कसून चौकशी केल्यावर संपूर्ण घटना समोर आली. याप्रकरणी गर्लफ्रेंड तरुणी आणि तिचा दुसरा बॉयफ्रेंड या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Boyfriend, Local18, Murder, Relationships