JOIN US
मराठी बातम्या / देश / सैराट पॅटर्न! प्रेमविवाह केला म्हणून सख्ख्या भावानं आधी बहिणीच्या पतीवर केले सपासप वार मग...

सैराट पॅटर्न! प्रेमविवाह केला म्हणून सख्ख्या भावानं आधी बहिणीच्या पतीवर केले सपासप वार मग...

प्रेमविवाह केला म्हणून सख्ख्या भावानं केली बहिण आणि तिच्या पतीची हत्या, 6 महिन्याआधी या दोघांचे लग्न झाले होते.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

रोहतक, 19 जून : हरियाणाच्या रोहतक जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथं सख्ख्या भावानं त्याच्या बहिणीची आणि तिच्या पतीच्या हत्या केली. 6 महिन्यांपूर्वी सुरेंद्र आणि पूजा यांचा प्रेमविवाह केला होता. दोघांचीही घरं गावात समोरासमोर होती.  सुरेंद्र नात्यानं पूजाचा चुलत भाऊ लागत होता. त्यामुळं घरच्यांचा या लग्नाला विरोध होता. कुटुंबियांनी तक्रार केल्यानंतर 5 महिन्यांपूर्वी दोघांनाही पंचायतीनं गाव सोडून जाण्याची शिक्षा दिली होती. यानंतर दोघेही रोहतकच्या दिल्ली रोडवरील एका कॉलनीत ते दोघं भाड्याच्या घरात राहत होते. ऑनर किलिंगच्या प्रकरणात पोलिसांनी पूजाचा भाऊ अजय आणि त्याचे दोन चुलत भाऊ, साहिल आणि बबलू यांना अटक केली आहे. पूजावर धारधार शस्त्रानं हल्ला करूनही ती भावांच्या तावडीतून कशीबशी वाचली. जखमी अवस्थेत गुरुवारी सकाळी शहरातील एक रस्त्यावर सापडली. अज्ञातांनी तिला त्वरित रुग्णालयात दाखल केले. वाचा- पुण्यापाठोपाठ आणखी एका शहरात सामूहिक आत्महत्या, 6 जणांचे मृतदेह आढळल्यानं खळबळ उपचारा दरम्यान झाला मृत्यू पूजच्या गळ्यावर चाकूच्या गंभीर जखमा होत्या. तिने डॉक्टरांना सांगितले की तिच्या भावाने तिच्यावर वार करून तिच्या पतीची हत्या केली. पूजाची प्रकृती चिंताजनक असल्यानं डॉक्टरांनी तिला रोहतक येथील एका रुग्णालयात पाठवले, मात्र तिथं पोहोचण्यापूर्वीच पूजाचा मृत्यू झाला. वाचा- ‘हा निर्णय आम्ही…’ भिंतीवर सुसाईड नोट लिहून पुण्यात दाम्पत्यानं मुलांसह संपवलं आरोपींनी दिली गुन्ह्याची कबुली पोलिसांनी पूजाच्या कुटुंबाला ताब्यात घेतले असून चौकशी सुरू केली आहे. गुरुवारी सायंकाळी उशिरा पोलिसांनी अजय, साहिल आणि बबलू यांनाही अटक केली. पूजाचा पती सुरेंद्र यांचा मृतदेह मेहम-बडसारा रोड शेजारील शेतात सापडला. दरम्यान आरोपी अजयनं कबूल केले की त्यानेच बहिणीची आणि तिच्या नवऱ्याची हत्या केली. बहिणीनं आपल्याच कुटुंबातील युवकाशी प्रेमविवाह केल्याचा त्याला राग आला होता. या रागात त्यानं चुलत भावांसोबत हा गुन्हा घडवून आणला. वाचा- पुण्यात सामूहिक आत्महत्येनं खळबळ! दाम्पत्यानं दोन चिमुकल्यासह संपवलं आयुष्य

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या