जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / पुण्यात सामूहिक आत्महत्येनं खळबळ! दाम्पत्यानं दोन चिमुकल्यासह संपवलं आयुष्य

पुण्यात सामूहिक आत्महत्येनं खळबळ! दाम्पत्यानं दोन चिमुकल्यासह संपवलं आयुष्य

पुण्यात सामूहिक आत्महत्येनं खळबळ! दाम्पत्यानं दोन चिमुकल्यासह संपवलं आयुष्य

एकाच कुटुंबातील चार जणांनी गळफास घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

पुणे, 19 जून : सामूहिक आत्महत्येनं पुण्यात मोठी खळबळ उडाली आहे. एकाच कुटुंबातील चार जणांनी गळफास घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सुखसागरनगर परिसरातील वाघजाईनगरात राहणाऱ्या कुटुंबानं टोकचं पाऊल उचलत आयुष्य संपवलं आहे. अतुल दत्तात्रय शिंदे, पत्नी जया शिंदे यांच्यासह 6 आणि 3 वर्षांची त्यांची दोन लहान मुलांचा सामावेश आहे. या दाम्पत्यानं आत्महत्या का केली याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. सामूहिक आत्महत्येची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह ताब्यात घेऊन त्यांनी शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. अतुल शिंदे यांनी आपल्या पत्नी आणि मुलांसह राहत्या घरात गळफास घेऊन आयुष्य संपवलं. हे वाचा- पुण्यात कोरोनाचा रेकॉर्ड ब्रेक, दिवसभरात वाढले सर्वाधिक रुग्ण अतुल आणि जया यांचा 2013 रोजी प्रेम विवाह झाला होता. पुण्यातील वाघजाईनगर इथे दोघंही राहात होते. त्यांना दोन मुलं होती. पहाटे तीन वाजाता या दाम्पत्यानं 6 वर्षीय श्रुग्वेद आणि 3 वर्षांच्या अंतरासोबत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. भारती विद्यापिठ पोलिस घटनास्थळावर दाखल गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु. हे वाचा- पुण्यात खळबळ! टाऊन प्लॅनिंगमधील बड्या अधिकाऱ्यासह पत्नी आणि मुलांवर गुन्हा संपादन- क्रांती कानेटकर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात