पुणे, 19 जून : एकाच कुटुंबातील चार जणांनी गळफास घेऊन जीवन संपवल्याचा धक्कादायक प्रकार वाघजाईनगर इथे घडला. अतुल दत्तात्रय शिंदे यांनी आपल्या पत्नी आणि दोन चिमुकल्यांसह राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवलं. हा टोकाचा निर्णय घेण्यामागचं कारण आर्थिक विवंचना होतं का याचा तपास पुणे पोलिसांकडून सुरू आहे. दरम्यान या प्रकरणी घरामध्ये पोलिसांना सुसाईट नोट सापली आहे. पोलिसांनी या प्रकरणी कोणालाही जबाबदार धरू नये. आम्ही आमच्या मर्जीनं आत्महत्या करत आहोत असं पेन्सिलिनं भिंतीवर लिहिलेली सुसाईड नोट पोलिसांना घटनास्थळावर मिळाली आहे. दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चारही जणांचे मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. आर्थिक संकटामुळे या कुटुंबीयानं टोकाचं पाऊल उचललं असावं असा प्राथमिक अंदाज आहे. परंतु तपासाअंती स्पष्ट होईल अशी माहिती भारती विद्यापिठ पोलिसांनी दिली. **
** काय आहे प्रकरण मुळचे परभणीचे असणारे अतुल आणि जया यांचा 2013 रोजी प्रेम विवाह झाला होता. पुण्यातील वाघजाईनगर इथे दोघंही राहात होते. त्यांना दोन मुलं होती. या दाम्पत्यानं 6 वर्षीय श्रुग्वेद आणि 3 वर्षांच्या अंतरासोबत गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्येचं नेमकं कारण काय याबाबत पोलिसांकडून सध्या तपास सुरू असल्याची माहिती मिळत आहे. हे वाचा- पुण्यातील चिनी कंपनीत घुसला कोरोना, 7 कर्मचारी पॉझिटिव्ह; 130 क्वारंटाइन हे वाचा- पुण्यात रस्त्यावर आढळलेल्या 4 महिन्यांच्या चिमुकलीच्या काकाचा शोध, आई बेपत्ता संपादन- क्रांती कानेटकर