Home /News /national /

पुण्यापाठोपाठ आणखी एका शहरात सामूहिक आत्महत्या, 6 जणांचे मृतदेह आढळल्यानं खळबळ

पुण्यापाठोपाठ आणखी एका शहरात सामूहिक आत्महत्या, 6 जणांचे मृतदेह आढळल्यानं खळबळ

4 मुलांची हत्या करून दोघांनी स्वत:ला संपवलं असावं अशी शंका व्यक्त केली जात आहे.

    अहमदाबाद, 19 जून : रहिवासी इमारतीमध्ये दोन जणांसह 4 मुलांचे मृतदेह आढळल्यानं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. गुजरातमधील अहमदाबाद इथे ही धक्कादायक घडना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस दाखल झाले असून त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार दोन जणांसह 4 मुलांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. 4 मुलांची हत्या करून दोघांनी स्वत:ला संपवलं असावं अशी शंका व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. हत्या आहे की आत्महत्या याचा पोलिसांकडून सध्या तपास सुरू आहे. तर तर ही आत्महत्या असल्याचा दावा वडिलांनी पोलिसांकडे केला आहे. हे वाचा-'हा निर्णय आम्ही...' भिंतीवर सुसाईट नोट लिहून पुण्यात कुटुंबानं संपवलं आयुष्य पुण्यातही सामूहिक आत्महत्येनं मोठी खळबळ उडाली. काच कुटुंबातील चार जणांनी गळफास घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सुखसागरनगर परिसरातील वाघजाईनगरात राहणाऱ्या कुटुंबानं टोकचं पाऊल उचलत आयुष्य संपवलं आहे. अतुल दत्तात्रय शिंदे, पत्नी जया शिंदे यांच्यासह 6 आणि 3 वर्षांची त्यांची दोन लहान मुलांचा सामावेश आहे. मानसिक विवंचनेतून ही आत्महत्या केल्याची माहिती मिळत आहे. हे वाचा-VIDEO - प्रसिद्ध कथेकऱ्यावर भाजपच्या माजी आमदाराने केला हल्ल्याचा प्रयत्न संपादन- क्रांती कानेटकर
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Gujrat

    पुढील बातम्या