JOIN US
मराठी बातम्या / देश / 'या' धान्याचं आहे हे एनर्जी बूस्टर पीठ; उकाड्यावर, आजारांवर गुणकारी! 'असं' बनवा सरबत

'या' धान्याचं आहे हे एनर्जी बूस्टर पीठ; उकाड्यावर, आजारांवर गुणकारी! 'असं' बनवा सरबत

सध्याचं कडक ऊन तर असह्य होऊ लागलं असून नुसतं थंडगार पाणी पित राहावंसं वाटतं. म्हणूनच आज आपण केवळ थंड नाही, तर थंडगार सोबतच एक पौष्टिक पेय पाहूया.

जाहिरात

शरीराला थंडावा मिळावा आणि एनर्जी टिकून राहावी यासाठी हे पीठ अतिशय फायदेशीर असतं.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मोहित शर्मा, प्रतिनिधी करौली, 15 जून : उन्हाळ्यात आपण हलकं खाण्यासोबतच जास्तीत जास्त पाणी आणि विविध प्रकारचे पेय पिण्यावर भर देतो. घरच्या घरीच कैरीचं पन्हं, ताक किंवा लिंबू सरबत बनवून पितो. तसेच कलिंगड, द्राक्ष, खरबूज यांसारखी पाणीदार फळंही खातो. सध्याचं कडक ऊन तर असह्य होऊ लागलं असून नुसतं थंडगार पाणी पित राहावंसं वाटतं. म्हणूनच आज आपण केवळ थंड नाही, तर थंडगार सोबतच एक पौष्टिक पेय पाहूया. पूर्वी आपली आजी उन्हाळ्यात एक पीठ हमखास बनवायची. तेच ते सातूचं पीठ. शरीराला थंडावा मिळावा आणि एनर्जी टिकून राहावी यासाठी सातूचं पीठ अतिशय फायदेशीर असतं. गहू, चण्याची डाळ, जिरं आणि मीठ इत्यादींच्या मिश्रणातून हे पीठ तयार होतं. अनेकजण हरभऱ्यापासूनही सातूचं पीठ बनवतात. या पिठामुळे पोटाला थंडावा मिळतो, शिवाय वजनही कमी होतं. त्यामुळे आज आपण या पिठापासून सरबत कसं बनवायचं ते पाहूया.

एका ग्लासमध्ये थंड पाणी घ्या. त्यात २-३ चमचे सातूचं पीठ मिक्स करून चवीनुसार मीठ आणि चिमूटभर साखर घाला. मग यात लिंबाचा रस आणि हिरव्या मिरचीचे तुकडे घाला. आता पौष्टिक सरबत तयार झालं आहे. दररोज सकाळी उपाशीपोटी हे पेय प्यायल्यास पचन चांगलं होण्यास आणि पोट साफ होण्यास मदत होते. पचनशक्ती सुधारल्यावर वजन आपोआप कमी होतं. कारण सातू खाल्ल्याने पोट अधिक भरलेलं राहतं. ज्यामुळे जास्त भूक लागत नाही आणि वजन वाढ होत नाही. ‘आजच्या ठळक बातम्या’ पुण्यातूनच होणार प्रसारित, ‘आकाशवाणी’चा तो निर्णय मागे सातूच्या पिठात कॅल्शियम आणि जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे लहान मुलांना, गर्भवती स्त्रियांना, वयस्कर व्यक्तींना हे पीठ आवर्जून दिलं जातं. स्त्रियांनी सातूचं पीठ नियमित खाल्ल्यास मासिक पाळीतल्या वेदना कमी होतात. स्नायू बळकट होण्यासही हे पीठ फायदेशीर ठरतं. सौंदर्याच्या दृष्टीनेही ते महत्त्वाचं मानलं जातं. कारण त्यामुळे डार्क सर्कल्स कमी होण्यास आणि केस गळती थांबण्यास मदत मिळते. शिवाय मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठीही या पीठाचा फायदा होतो. सातूमधील फायबर हे मधुमेही रुग्णांसाठी फायदेशीर ठरतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सातूच्या सेवनाने शरीरातील उष्णता कमी होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या