चंद्रकांत फुंदे, प्रतिनिधी पुणे, 15 जून : देशातील सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या पुणे आकाशवाणी केंद्रावरून प्रादेशिक बातम्याचा विभाग छत्रपती संभाजीनगरला हलवणार असा निर्णय झाला होता. मात्र अखेरीस हा निर्णय आता मागे घेण्यात आला आहे. त्यामुळे हे आकाशवाणीच्या पुणे केंद्रातूनच आजच्या ठळक बातम्या प्रसारित होणार आहे. आकाशवाणी पुणे केंद्रातील प्रादेशिक वृत्त विभाग बंद करण्याचा निर्णय प्रसारभारतीने घेतला होता. त्यामुळे सविस्तर बातम्या ऐकणाऱ्या नागरिकांना बातम्या आता ऐकता येणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, पुणे आकाशवाणी वरून प्रसारित होणाऱ्या बातम्यांचे युनिट औरंगाबादला हलवण्याचा निर्णयाला केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी स्थगिती दिली आहे.
खासदार प्रकाश जावडेकर यांनी ठाकूर यांच्याशी संपर्क साधून या संदर्भात चर्चा केली. तसंच प्रसार भारतीचे अपूर्व चंद्र आणि मुख्य कार्यकारी अधिकारी द्विवेदी यांच्याशीही जावडेकर यांची चर्चा झाली आहे. पुणे आकाशवाणी वरून प्रसारित होणाऱ्या बातम्यांचे युनिट औरंगाबादला हलवण्याचा निर्णय रद्द करावा या संदर्भात जावडेकर यांनी चर्चा केली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. (Pune News : मरणाने केली ‘थट्टा’, पुण्यासारख्या शहरात ‘ते’ रात्री मृतदेह घेऊन फिरत होते!) जावडेकर सध्या हैदराबाद इथं असून त्यांनी या विषयासंदर्भात अनुराग ठाकूर यांच्याशी फोनवर चर्चा केली. या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला. या बाबत स्वतंत्र सविस्तर चर्चा जावडेकर दिल्लीत गेल्यानंतर होणार आहे. काय होता निर्णय? काही दिवसांपूर्वी प्रसारभारतीकडून यासंबंधीचा लेखी आदेश काढला होता.19 जूनपासून पुणे वृत्त विभागामार्फत प्रसारित होणारं आकाशवाणीवरील प्रादेशिक आणि राष्ट्रीय मराठी बातमीपत्र छत्रपती संभाजीनगर वृत्त विभागाकडे सोपवण्यात आलं. आकाशवाणीवरील पुणे प्रादेशिक वृत्त विभागाकडून सकाळी 7 वाजून 10 मिनिटांनी होणाऱ्या, FM वाहिनीवरील सकाळी 8, 10.58 आणि 11.58, तसेच सायंकाळी 6 च्याही बातम्या आता बंद होणार होतं. ( पुणे : पती वेळ देत नव्हता, पत्नीने जे केलं ते हादरवणारंच, सर्वच जण चक्रावले ) त्याचप्रमाणे सकाळी 8.30 वाजता राष्ट्रीय बातम्यांचे प्रसारणही बंद करण्याचा निर्णय घेतला होता. या बातम्या आता छत्रपती संभाजी नगर केंद्राहून दिल्या जाण्याची शक्यता होती. पुण्यातील प्रादेशिक वृत्त विभाग बंद होणार असल्यामुळे या बातम्या तिथे पोचणार कशा, पुण्यातील घडामोडींची दखल औरंगाबादहून कशी घेतली जाणार याबाबत अनिश्चितता निर्माण झाली होती. पुण्यातील केंद्राची स्थापना 1953 मध्ये झाली होती. देशात आकाशवाणीच्या पुणे केंद्राला सर्वाधिक श्रोते आहेत. सुमारे 24 लाख श्रोते नियमितपणे कार्यक्रम ऐकतात. या केंद्रावरून गेल्या 40 वर्षांपासून बातम्या प्रसारित होत होत्या. मात्र या निर्णयामुळे नियमित बातम्या ऐकणाऱ्या श्रोत्यांची गैरसोय होणार होती, अखेरीस हा निर्णय मागे घेतल्यामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.