सहारनपूर, 28 जून : भीम आर्मी पक्षाचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांच्या ताफ्यावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. अज्ञात टोळ्यांनी चंद्रशेखर आझाद यांच्या गाडीवर बेछूट गोळीबार केला. या हल्ल्यातून चंद्रशेखर आझाद थोडक्यात बचावले आहे. पण एक गोळी कंबरेला चाटून गेली आहे. आझाद यांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल केलं आहे. सहारनपूरमध्ये ही घटना घडली आहे. सहारनपूरमध्ये आज 28 जून रोजी संध्याकाळी ही घटना घडली आहे. चंद्रशेखर आझाद यांच्या ताफ्यावर सशस्त्र टोळीने गोळीबार केला. या हल्ल्यात एक गोळी त्याच्या कंबरेला चाटून गेली. सध्या त्यांची प्रकृती ठीक आहे आणि त्याला वैद्यकीय उपचारांसाठी सीएचसीमध्ये नेण्यात आले आहे. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
चंद्रशेखर आझाद यांचा ताफा सहारनपूर इथं पोहोचला होता. त्याचवेळी अज्ञात हल्लेखोरांनी गाडीवर गोळीबार केला. कारमध्ये आझाद यांच्यासोबत चार जण होते. अचानक झालेल्या या गोळीबारामुळे ड्रायव्हरने गाडी बाजूला घेतली. या गोळीबार आझाद यांच्यासह त्यांचे साथीदारही जखमी झाले. सुदैवाने या हल्ल्यात ते थोडक्यात बचावले. (Fake Currency : नकली नोटांची क्वालिटी अशी सुधारली, पोलीसही झाले हैराण, दोघांना अटक) या हल्लानंतर चंद्रशेखर आझाद यांनी प्रतिक्रिया दिली. माझं कुणासोबत भांडण नाही. माझ्यावर अचानकपणे हल्ला झाला. आम्ही जेव्हा चाललो होतो तेव्हा आम्ही एकटेच होतो. काही गाड्या या मागे पुढे होत्या. अचानक आमच्यावर गोळीबार झाला. पण वेळी ड्रायव्हरने गाडी मागे फिरवली, त्यामुळे आम्ही वाचलो, असं आझाद यांनी सांगितलं.