JOIN US
मराठी बातम्या / देश / IAS Love Story: टीना दाबींची IAS बहीण रियाची फिल्मी Love Story; IPS अधिकाऱ्यासोबत असं जुळलं सूत

IAS Love Story: टीना दाबींची IAS बहीण रियाची फिल्मी Love Story; IPS अधिकाऱ्यासोबत असं जुळलं सूत

IAS रिया दाबीने IPS मनीष कुमारशी लग्न केलं आहे, जो LBSNAA ट्रेनिंग दरम्यान रियाचा बॅचमेट होता.

जाहिरात

IAS रिया दाबी आणि IPS मनीष कुमार

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 15 जुलै : अनेक IAS अधिकारी सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहेत. आयएएस टीना दाबी आणि त्यांची धाकटी बहीण रिया दाबी यांचाही त्यात समावेश आहे. टीना दाबी 2015 च्या UPSC बॅचच्या टॉपर आहेत, तर रियाने 2020 च्या परीक्षेत 15 वा क्रमांक मिळवला आहे. दोन्ही बहिणी लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होत्या. IAS टीना दाबी यांच्या प्रेमकहाणी आणि लग्नाच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून चर्चेत होत्या. त्यांचे फोटोही सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते . जून 2023 मध्ये त्यांची धाकटी बहीण रिया दाबीच्या लग्नाची बातमी व्हायरल झाली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, IAS रिया दाबीने IPS मनीष कुमारशी लग्न केलं आहे, जो LBSNAA ट्रेनिंग दरम्यान रियाचा बॅचमेट होता. Tina Dabi Pregnant : टीना डाबी होणार 43 वर्षीय गवांडेंच्या बाळाची आई; यात काय असतो धोका? IAS रिया दाबी, तिचा पती मनीष कुमार आणि दोघांच्याही कुटुंबातील कोणीही लग्नाच्या बातमीला अजून दुजोरा दिलेला नाही. रिया दाबी राजस्थानमध्ये तैनात असून मनीषने लग्नाचं कारण देत राजस्थान केडरमध्ये बदलीसाठी अर्ज केला होता. येथूनच चर्चा सुरू झाल्या. मात्र, आता मनीष कुमार आयपीएसच्या एका इंस्टाग्राम पोस्टने या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. रिया दाबीने 12 जुलै 2023 रोजी तिचा 25 वा वाढदिवस साजरा केला. या खास प्रसंगी तिचा पती मनीष कुमारने एक कपल फोटो पोस्ट केला. यासोबतच्या कॅप्शनमध्ये रियाचं अभिनंदन करताना त्यांनी लिहिलं की, हा केवळ वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याचा दिवस नाही, तर या सुंदर आणि समजूतदार व्यक्तीने माझं आयुष्य अत्यंत काळजीने, प्रेमाने आणि आनंदाने भरवलं आहे. त्यामुळे हा दिवस देवाचे आभार मानण्याचा दिवस आहे. रिया दाबी आणि मनीष कुमार हे दोघेही सध्या राजस्थानमध्ये तैनात आहेत. आयएएस रिया दाबी बांसूर, अलवर येथे एसीएम म्हणून तैनात आहेत. तर मनीष कुमार यांनाही राजस्थानच्या अलवरमध्ये पोस्टिंग मिळाली आहे. आयएएस टीना दाबी या जैसलमेरच्या डीएम म्हणून तैनात होत्या, परंतु आता त्यांनी प्रसूती रजेसाठी अर्ज केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या