sonia gandhi
लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी भोपाळ, 18 जुलै : काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग झाल्याची घटना समोर आली आहे. बंगळुरूहून दिल्ली जात असताना अचानक विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. सोनिया गांधी यांचे विमान भोपाळ विमानतळावर उतरवण्यात आले आहे. विमानाचे प्रेशर डाऊन झाल्यामुळे ही घटना घडली असल्याचे समोर आले आहे. विमान 40 हजार फुटाहून थेट 12 फुटावर खाली आल्याने इमर्जन्सी लँडिंग करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. आज बंगळुरूमध्ये विरोधकांची बैठक पार पडली. बैठक संपल्यानंतर सोनिया गांधी या राहुल गांधी यांच्यासोबत दिल्लीला रवाना झाल्या होत्या.
बंगळुरूही चार्टर्ड प्लेनने सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे दिल्लीकडे निघाले होते. पण अचानक विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे भोपाळमधील राजा भोज विमानतळावर विमानाचे लँडिंग करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार,विमानाचे प्रेशर डाऊन झाल्यामुळे ही घटना घडली असल्याचे समोर आले आहे. विमान 40 हजार फुटाहून थेट 12 फुटावर खाली आल्याने इमर्जन्सी लँडिंग करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, सोनिया गांधी आता इंडिगोच्या फ्लाइटने दिल्लीला निघाल्या आहे. त्यांच्यासोबत राहुल गांधी सुद्धा सोबत आहे. (विरोधकांची पुढची बैठक मुंबईत, बंगळुरूमधून उद्धव ठाकरेंचा भाजप सरकारवर घणाघात) दरम्यान, बंगळुरूमध्ये विरोधी पक्षाच्या दोन दिवसांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. एकूण 26 पक्ष या बैठकीमध्ये सहभागी झाले आहेत. या बैठकीत आघाडीच्या नावाबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. विरोधी पक्षांनी त्यांच्या आघाडीचं नाव INDIA ठेवलं आहे. या नावाचा फूलफॉर्म (Indian National Democratic Inclusive Alliance)असल्याचं सांगण्यात येत आहे. विरोधी पक्षांच्या आघाडीचं हे नाव टीएमसीच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी कालच्या बैठकीत सुचवलं होतं, ज्यावर बहुतेक विरोधकांनी सहमती दर्शवली. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार या नावाबाबत अजूनही अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही, पण बहुतेक पक्षांनी या नावाचं समर्थन केलं आहे. भारतामध्ये पुढच्या वर्षी लोकसभा निवडणुका होणार आहेत. सत्ताधारी भाजपच्याविरुद्ध सगळे विरोधक एकत्र यायचा प्रयत्न करत आहेत. याचाच भाग म्हणून 17 आणि 18 जुलैला बंगळुरूमध्ये 26 विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक होत आहे. याआधी जून महिन्यात बिहारच्या पाटण्यामध्ये विरोधकांची बैठक झाली होती.