JOIN US
मराठी बातम्या / देश / लॉकडाउनच्या काळात 'हे' रुग्ण झाले कमी, नवी माहिती समोर

लॉकडाउनच्या काळात 'हे' रुग्ण झाले कमी, नवी माहिती समोर

आयुष्मान भारत अंतर्गत असलेल्या रुग्णालयांमधून या रुग्णांसाठी केलेल्या दाव्यांमधील कपात लक्षात घेता गंभीर चिंता व्यक्त केली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 22 जून : देशात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन लागू करण्यात आलं होतं. लॉकडाउनच्या काळात कर्करोगाच्या 64 टक्के  रुग्णांच्या दाव्यात घट झाली आहे. त्याचवेळी सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये 26 टक्के पेक्षा कमी प्रसूती झाली आहे. आयुष्मान भारत अंतर्गत असलेल्या रुग्णालयांमधून या रुग्णांसाठी केलेल्या दाव्यांमधील कपात लक्षात घेता गंभीर चिंता व्यक्त केली आहे. एनएचएच्या म्हणण्यानुसार, पूर्व निर्धारित ऑपरेशन्समध्ये जवळपास 90 टक्के कपात झाली आहे. यामुळे आरोग्य क्षेत्रासमोर एक वेगळेच आव्हान उभे ठाकले आहे. मोदी सरकारच्या या मोठ्या निर्णयाविरोधात आदित्य ठाकरेंनी थोपटले दंड यावर्षी 1 जानेवारी ते 2 जून या अहवालात लॉकडाउन करण्यापूर्वी दर आठवड्यात प्रसूतीसाठी सुमारे 3 हजार 773 प्रसूती दावे असल्याचे म्हटले गेले होते. तर लॉकडाउनच्या  दरम्यान, ही संख्या 2 हजार 680 वर पोहोचली. खासगी रुग्णालयांविषयी बोलताना, सरासरी 472 रुग्णांना पहिले दावे मिळत होते. परंतु, लॉकडाऊन मध्ये 389  दावे आढळले. सी रुग्णालयाच्या प्रत्येक आठवड्यात सरकारी रुग्णालयांकडून 3045 आणि खासगी रुग्णालयांकडून 783 दावे प्राप्त झाले आहेत. लॉकडाउनच्या दरम्यान 2322 आणि 620 दावे  प्राप्त होते.  यावरून हे सूचित होते  की, लॉकडाउन कालावधी दरम्यान गर्भवती महिलांच्या प्रसूतीवर लक्षणीय परिणाम झाला आहे. आणखी एक परीक्षा पुढे ढकलली; उच्च शिक्षण मंत्र्यांची घोषणा या योजनेंतर्गत 21 हजाराहून अधिक रुग्णालये सक्षम केली गेली असून या योजनेतून 50 कोटी लोकांना वर्षाकाठी 5 लाख रुपयांचा आरोग्य विमा दिला जातो. कर्करोगाच्या उपचारासाठी बरीच खाजगी रुग्णालये आहेत. त्यामुळे मोठ्या संख्यने रुग्ण खासगी रुग्णालयात जातात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या