Home /News /news /

BREAKING : आणखी एक परीक्षा पुढे ढकलली; उच्च शिक्षण मंत्र्यांची घोषणा

BREAKING : आणखी एक परीक्षा पुढे ढकलली; उच्च शिक्षण मंत्र्यांची घोषणा

'विद्यार्थी आणि पालकांकडून या प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्याविषयी सातत्याने मागणी होत होती'

    मुंबई, 22 जून : राज्यात कोरोनाची परिस्थिती पाहता राज्य सरकारने विद्यापीठांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावर ठाम आहे. आता त्यानंतर राज्य सामायिक प्रवेश परीक्षा  कक्षाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या उच्च शिक्षण आणि तंत्र शिक्षण विभागाच्या विविध विषयांच्या प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. 'राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या (CET- सेल) माध्यमातून दरवर्षी उच्च शिक्षण आणि तंत्र शिक्षण विभागाच्या विविध विषयांच्या प्रवेश परीक्षा घेण्यात येतात. सध्या संपूर्ण देशात आणि  महाराष्ट्रात कोविड- 19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत' असं उदय सामंत यांनी स्पष्ट केले. चिनी कंपन्यांसोबत 5000 कोटींच्या करारावर ठाकरे सरकारचा मोठा निर्णय 'विद्यार्थी आणि पालकांकडून या प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्याविषयी सातत्याने मागणी होत होती. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असून या सर्व परीक्षांच्या तारखा नव्याने जाहीर करण्यात येतील', असंही  सामंत यांनी संगितलं. दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच  बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय झाला आहे, अशी घोषणा  उच्च आणि तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केली होती. बापरे! मुंबईत पावसाळ्यात कोरोनाचे रुग्ण वाढणार, आयुक्तांनी दिला इशारा 'महाविकासआघाडी सरकार विद्यार्थ्यांच्या बाजूने! अंतिम वर्ष परीक्षांबाबत आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक झाली. बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय झाला. व्यावसायिक अभ्यासक्रमांबाबतही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय रेग्युलेटरी बॉडींना कळवण्याचा निर्णय झाला,' असं ट्वीट प्राजक्त तनपुरे यांनी केलं होतं. राज्यपालांसोबत होणार संघर्ष? दरम्यान, महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी अंतिम वर्ष परीक्षा रद्द करणं कायदेशीरदृष्ट्या योग्य नसल्याचं मत व्यक्त केलं होतं. त्यानंतर राज्य सरकार आपल्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावर ठाम असल्याने राज्य सरकार विरुद्ध राज्यपाल असा संघर्षाचा नवा अध्याय पाहायला मिळेल अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. संपादन - सचिन साळवे

    तुमच्या शहरातून (मुंबई)

    First published:

    Tags: Uday samant, उदय सामंत

    पुढील बातम्या