JOIN US
मराठी बातम्या / देश / हायवेवर 12 तास तरुणाच्या अंगावरून गेल्या हजारो गाड्या, पोलिसांना गोळा कराव्या लागल्या मृतदेहाच्या चिंधड्या

हायवेवर 12 तास तरुणाच्या अंगावरून गेल्या हजारो गाड्या, पोलिसांना गोळा कराव्या लागल्या मृतदेहाच्या चिंधड्या

माणुसकीला काळीमा फासणारी घटना, 12 तास हायवेवर पडून राहिला मृतदेह पण कोणी लक्ष दिले नाही.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अमरोहा, 25 फेब्रुवारी : माणुसकीला काळीमा फासणाऱ्या अनेक घटना दररोज येत असतात. या घटना वाचल्यानंतर लोकांमधली माणुसकीचे मेली आहे की काय? असा प्रश्न मनात येतो. असाच काहीसा प्रकार दिल्ली-लखनऊ हायवे मार्गावर घडला. या हायेवर रस्ता ओलांढताना एकाचा मृत्यू झाला. मात्र त्याचा मृतदेह तब्बल 12 तास हायवेवर होता, मात्र कोणीच त्याकडे लक्ष दिले नाही. मुख्य म्हणजे त्याच मार्गावरून 10 ते 15वेळा पोलिसांची गाडी गेली. मात्र या मृतदेहाकडे कोणाचे लक्ष नव्हते. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार शनिवार (22 फेब्रुवारी) ही घटना घडली. सायंकाळी हायवे ओलांढताना एका भरधाव वेगानं येणाऱ्या गाडीने त्याला धडक दिली. त्याचा जागीच मृत्यू झाला, पण ज्या गाडीने ज्याचा अपघात झाला तो गाडीवाला थांबलाही नाही. त्यानंतर तब्बल 12 तास हजारो गाड्या या मृतदेहावरून गेल्या. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, अपघात झालेल्या तरुणाच्या मृतदेहाचा अक्षरक्ष: चूरा झाला होता. तब्बल 13 तासांनी पोलिसांना याबाबत माहिती मिळाली. वाचा- दिल्लीत सकाळ होताच दगडफेक आणि जाळपोळ सुरू, हिंसाचारात आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतदेहाची खुप वाईट अवस्था झाली होती. त्यामुळं मृतदेहाची ओळख पटवणेही कठिण झाले होते. तरी पोलिसांनी मृतदेहाच्या कपड्यावरून त्याचे लिंग ओळखण्याचा प्रयत्न केला. तर, पोस्टमार्टमसाठी हा मृतदेह पाठवण्यात आला आहे. गुजराला पोलीस स्थानकाचे मुख्य अधिकारी जयवीर सिंग यांनी, DNA रिपोर्टही काढली आहे, मात्र अद्याप मृतहेदाची ओळख पटलेली नाही. वाचा- जपान क्रुझवरील आणखी एका प्रवाशाचा मृत्यू, तब्बल 14 भारतीयांना कोरोनाची लागण पुणे-मुंबई एक्सेप्रेस वेवरही घडला होता असाच प्रकार गेल्याच आठवड्यात अशीच एक घटना घडली होती. पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर भरधाव वेगाने आलेल्या कारच्या धडकेत एकाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर जवळपास 60 वाहने त्याच्या मृतदेहावरून गेली. पोलिसांनी विखुरलेल्या मृतदेहाचे अवशेष एकत्रित केले आणि नंतर मृत व्यक्तीची ओळख त्याच्या शर्टच्या खिशातून सापडलेल्या कागदपत्रातून केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रस्त्यावर दीडशे मीटरपर्यंत रक्तस्त्राव पसरला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या