नवी दिल्ली, 25 फेब्रुवारी : नागरिकत्व कायदा दुरुस्ती (CAA) ने सुरू झालेल्या आंदोलानाने आता दिल्लीत हिंसक वळण घेतलं आहे. उत्तर पूर्व दिल्लीत तणावपूर्ण वातावरण तयार झालं आहे. ईशान्य दिल्लीत सोमवारी हिंसाचार झाला तर आज मंगळवारी मौजपूर आणि ब्रह्मपुरी भागात दगडफेक सुरू झाली. दिल्लीतील हिंसाचारात आतापर्यंत हेड कॉन्स्टेबल रतनलाल यांच्यासह 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच, 100 हून अधिक जखमी आहेत. मंगळवारी सकाळीही दिल्लीत परिस्थिती तणावपूर्ण आहे. सकाळी पाच मोटारसायकलींना आग लावण्यात आली. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पहाटेच्या सुमारास मौजपूर आणि आसपासच्या भागात आग लागल्याचे अग्निशमन दलाला 45 फोन आले, ज्यामध्ये एका अग्निशमन इंजिनवर दगडफेक करण्यात आली. त्यामुळे अग्निशमन इंजिनला आग लागली. यामध्ये तीन फायरमन जखमी झाले आहेत.
Delhi: Police & Rapid Action Force (RAF) personnel hold flag march in Brahampuri area, after stone-pelting incident between two groups in the area, today morning. #NortheastDelhi pic.twitter.com/NkjrSrmBPD
— ANI (@ANI) February 25, 2020
Delhi: Stone pelting between two groups in Brahampuri area, today morning. #NortheastDelhi pic.twitter.com/XR1lRZ0Ryt
— ANI (@ANI) February 25, 2020
अमित शहांनी दिल्ली हिंसाचारावर घेतली महत्त्वाची बैठक गृह मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काल रात्री गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्ली हिंसाचार प्रकरणावर मोठी बैठक घेतली. अहमदाबादहून परतल्यानंतर लवकरच अमित शहा यांनी आढावा बैठक घेतली. सकाळी 11 ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत चाललेल्या या बैठकीत गृहसचिव, इंटेलिजन्स ब्युरो चीफ, दिल्ली पोलीस आयुक्त आणि गृह मंत्रालयाचे अन्य अधिकारी सहभागी होते. परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दिल्ली हिंसाचारात पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या तरुणाला अटक दिल्ली पोलिसांनी नागरिकता सुधार कायद्या (CAA) विरोधात झालेल्या हिंचारामध्ये गोळीबार करणाऱ्या तरुणाला ताब्यात घेतलं आहे. शाहरुख असं बंदूक घेऊन गोळ्या झाडणाऱ्या तरुणाचं नाव असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. या तरुणाने ईशान्य दिल्लीमध्ये उफाळलेल्या हिंसाचारामध्ये जमावावर गोळीबार केला तर सध्या या पोलिसांच्या ताब्यात आहे. नागरिकत्व कायद्याबाबत सोमवारी दिल्लीत हिंसक निदर्शने झाली. या हिंसक निदर्शनात पोलिस कॉन्स्टेबलसह 7 जणांचा मृत्यू झाला तर सुमारे 70 हून अधिक लोक जखमी असल्याची माहिती आहे. ईशान्य दिल्लीच्या विविध भागांत सुधारित नागरिकत्व कायद्याच्या (सीएए) समर्थन आणि विरोधात झालेल्या हिंसाचाराच्या वेळी एका युवकाने पोलिस कर्मचाऱ्यावर गोळीबार केला. याचा एक व्हिडिओदेखील समोर आला आहे. यामध्ये हा तरुण पोलीस कर्मचाऱ्याकडे धावत असताना दिसत आहे. आज सर्व शाळा बंद, परीक्षाही रद्द नागरिकत्व सुधार अधिनियम (CAA) च्या निषेधार्थ दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी सोमवारी ईशान्य दिल्लीतील अनेक भागात हिंसाचारानंतर शाळा बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. मंगळवारी हिंसाचारग्रस्त ईशान्य दिल्लीतील शाळांमध्ये कोणत्याही वर्गाच्या परीक्षा होणार नाहीत आणि सर्व सरकारी व खासगी शाळा बंद राहतील असं सिसोदिया (Manish Sisodiya) म्हणाले आहेत.