टोकियो, 25 फेब्रुवारी : कोरोनाव्हायरसमुळे (Coronavirus) जगभरात हाहाकार पसरला आहे. फक्त चीनचं नाही तर इतर देशांमध्येही जपाट्याने कोरोनाव्हायरस पसरत आहे. जपानच्या सागरी तटावर उभ्या असलेल्या जहाजामधील कोरोनाव्हायरसची लागण झालेल्या आणखी एकाचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत जहाजामधील 4 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, दक्षिण कोरियामध्ये एका दिवसात 60 लोकांना कोरोनाव्हायरसची लागण झाली आहे.
कोरिया रोग आणि नियंत्रण प्रतिबंधक केंद्रांनी मंगळवारी सांगितले की, देशात आतापर्यंत 893 लोकांना व्हायरसची लागण झाली आहे. तर, आठ जणांचा मृत्यू झाला आहे. चीनबाहेरचे हे सर्वाधिक प्रकरण आहे. त्याचबरोबर सोमवारी जपानच्या डायमंड शिपवर आणखी दोन भारतीयांना याची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळं आतापर्यंत तब्बल 14 भारतीयांना याची लागण झाली आहे. दुसरीकडे, चीनमध्ये एका दिवसात 71 लोकांचा मृत्यू झाला. त्यात हुबेईमध्ये 68 लोकांच मृत्यू झाला.
Fourth person from quarantined Japan ship (Diamond Princess) dies: AFP news agency. #CoronaVirus
— ANI (@ANI) February 25, 2020
वाचा-अबब! रुग्णाच्या पोटातून काढली तब्बल 7 किलोंची किडनी
चीनच्या आरोग्य प्राधिकरणाने मंगळवारी सांगितले की सोमवारी चीनमध्ये 508 लोकांना या व्हायरसची लागण झाली आहे. आतापर्यंत येथे 2650 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 77,657 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. तर 27 हजाराहून अधिक लोकांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे.
वाचा-तरुणीवर बॉयफ्रेंड आणि मित्रांनीच केला बलात्कार, रात्रभर पडून राहिली बेशुद्ध
3 फेब्रुवारीपासून जहाज योकोहामा बंदरात अडकले आहे
जपानी जहाजावर एकूण 138 भारतीय आहेत. यात क्रूचे 132 सदस्य आणि 6 प्रवाश्यांचा समावेश आहे. गेल्या महिन्यात हाँगकाँग येथून निघाल्यानंतर जहाजातील एका प्रवाशाला संसर्ग झाल्याचे दिसून आले. हे जहाज जपानमधील योकोहामा बंदरात 3 फेब्रुवारीपासून अडकले आहे.
वाचा-दादांनी काढला पराभवाचा वचपा, माळेगाव निवडणुकीत अजित पवारांच्या पॅनलने मारली बाजी
आतापर्यंत 14 भारतीयांना जपानी जहाजावर संसर्ग झाला आहे
जपानमधील भारतीय दूतावासाने सोमवारी ट्विट केले की, या जहाजावरील 14 भारतीयांना कोरोनाची लागण झाली आहे. सर्वांवर उत्तम उपचार दिले जात आहेत. बुधवारी आणखी काही लोकांचे चाचणी निकाल येत आहेत. आशा आहे की यात आणखी कोणतेही भारतीय राहणार नाहीत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Japan