JOIN US
मराठी बातम्या / देश / केजरीवालांचं पंतप्रधानांना पत्र; पंतप्रधान मोदी मागणी मान्य करणार का?

केजरीवालांचं पंतप्रधानांना पत्र; पंतप्रधान मोदी मागणी मान्य करणार का?

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहीलं आहे. या पत्रात त्यांनी महत्त्वपूर्ण मागणी केली आहे.

जाहिरात

केजरीवालांंचं मोदींना पत्र

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 3 एप्रिल : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहीलं आहे. पूर्वी ज्येष्ठ नागरिकांना रेल्वेच्या प्रवासात पन्नास टक्के सवलत मिळत होती. मात्र ती आता बंद करण्यात आली आहे. ती पुन्हा सुरू करावी अशी मागणी केजरीवाल यांनी या पत्राद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. आता केजरीवाल यांच्या मागणीवर केंद्र सरकार काय निर्णय घेणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. केजरीवालांनी पत्रात काय म्हटलं? देशातील ज्येष्ठ नागरिकांना गेली अनेक वर्ष रेल्वे प्रवास भाड्यात पन्नास टक्के सूट मिळत होती. या योजनेचा लाभ लाखो ज्येष्ठ नागरिकांनी घेतला, मात्र तुमच्या सरकारने ही सवलत बंद केली, ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. लोकसभेत सरकारने सांगितलं होतं की रेल्वे प्रवासात वृद्धांना देण्यात येणारी सूट बंद केल्यानंतर वर्षाकाठी 1600 कोटी रुपयांची बचत होत आहे. मात्र ज्येष्ठांच्या आनंदासाठी ही सवलत पुन्हा सुरू करावी अशी मागणी केजरीवाल यांनी या पत्राद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे. …म्हणून पंतप्रधानांची पदवी संसद भवनाच्या प्रवेशद्वारावर लावावी; राऊतांचा मोदींना खोचक टोला! सवलत पुन्हा सुरू करावी या पत्रात पुढे अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे की अनेकदा आपल्याला गर्व होते की, आपण जे मिळवलं आहे ते सर्व आपल्या मेहनतीच्या बळावर मिळवलं. मात्र तुमचे प्रयत्न यशस्वी होण्यासाठी वृद्धांचा आशीर्वाद आवश्यक असतो. त्यांच्या आशीर्वादाशिवाय कोणताही समाज प्रगती करू शकत नाही. वृद्धांना त्यांच्या पसंतीच्या तीर्थस्थळाला भेट देता यावी म्हणून आम्ही दिल्लीमध्ये मोफत व्यवस्था केली आहे. आता आपण देखील ही रेल्वेची सवलत पुन्हा सुरू करावी अशी मागणी केजरीवाल यांनी केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या