वडिलांच्या खास मित्राची ऐतिहासिक कबर बांधण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि 1840च्या सुमारास हे बांधकाम पूर्ण केलं.
शक्ती सिंह, प्रतिनिधी कोटा, 10 जून : राजस्थान हे राज्य जगभरात ऐतिहासिक महाल आणि हवेल्यांसाठी ओळखलं जातं. दरवर्षी लाखो पर्यटक येथे येतात. या प्रत्येक महालांचा, हवेल्यांचा स्वतःचा असा एक इतिहास आहे, त्यांच्या उभारणीमागे अनेक कथा आहेत. असंच एक ऐतिहासिक बांधकाम अठराव्या शतकाच्या मध्यात कोटा शहरात घडलं. राजपूती स्थापत्यकलेचा हा एक अद्वितीय नमुना मानला जातो. शहरातील गुलाब वाडीत दलेल खान यांची ही कबर आहे जी दिवाण माधोमसिंह यांनी बांधली होती. इतिहासकार फिरोज अहमद यांनी दिलेल्या माहितीनुसार, 1770 ते 1819 पर्यंत महाराव उम्मेद सिंह प्रथम हे कोटाचे शासक होते. त्यांच्या कार्यकाळात कोटाचा दिवाण म्हणून जालिम सिंह हे कार्यभार सांभाळत होते. तर दलेल खान हे कोटा सैन्याचे सर्वोच्च कमांडर होते. जालिम सिंह आणि दलेल खान यांची खूप घट्ट मैत्री होती. त्यांच्या मैत्रीकडे हिंदू-मुस्लिम एकतेचं प्रतीक म्हणून त्यावेळी पाहिलं जायचं. दलेल खानला माझ्या आधी मरण आलं तर मी जगू शकणार नाही, असं जालिम सिंह म्हणायचे. अशी त्यांची दृढ मैत्री होती. त्यांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं.
दलेल खान हे कोटा सैन्याचे सर्वोच्च कमांडर असण्याबरोबर एक उत्तम बांधकाम व्यावसायिकही होते. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली झालरापाटन किल्लाचं बांधकाम पार पडलं होतं. दरम्यान, 1824 साली कोटाचे दिवाण जालिम सिंह यांचं निधन झालं. अखेर ते बोलायचे त्याप्रमाणे दलेल खान यांच्याआधीच त्यांचा मृत्यू झाला. मात्र त्यानंतर नऊ वर्षांनी दलेल खान यांनाही मरण आलं. Ajit Pawar : सुप्रियाताईंना नव्या इनिंगसाठी अजितदादांच्या शुभेच्छा, म्हणाले… जालिम सिंह यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा माधोमसिंह कोटाचे दिवाण झाले. वडील आणि दलेल खान यांच्या मैत्रीबद्दल ते बालपणापासून ऐकत होते. त्यामुळेच वडिलांच्या खास मित्राची ऐतिहासिक कबर बांधण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि 1840च्या सुमारास हे बांधकाम पूर्ण केलं. या वास्तूमध्ये दलेल खान आणि त्यांची पत्नी बिवी जोहरा अशा दोन समाध्या आहेत. याठिकाणी प्रत्येक धर्माच्या अनुयानांना प्रवेश दिला जातो.