JOIN US
मराठी बातम्या / देश / वासरू नाही, तरीही 5 लीटर दूध देते ही गाय; गावकरी म्हणतात 'कामधेनू'

वासरू नाही, तरीही 5 लीटर दूध देते ही गाय; गावकरी म्हणतात 'कामधेनू'

ही जवळपास 4 वर्ष वयाची गाय आहे. गेल्या वर्षभरापासून ती सलग दूध देते. परंतु मालक तिचं दूध वापरत नाहीत किंवा विकतही नाहीत. तर…

जाहिरात

श्रावण महिन्यात पहिल्यांदा या गायीच्या स्तनांमधून दूध निघाल्याचं मालकाच्या निदर्शनास आलं होतं.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

गौरव सिंह, प्रतिनिधी भोजपूर, 25 जून : एखाद्या स्त्रीने बाळाला जन्म दिला की तिच्या स्तनांमधून दूध येऊ लागतं. त्याचप्रमाणे गायीनेही वासराला जन्म दिला की तिच्या स्तनांमधून दूध येतं. परंतु बिहारच्या आरा भागातील एक गाय मात्र वासराला जन्म न देताच दूध देऊ लागली आहे. या गायीला तेथील लोकांनी कामधेनूचा दर्जा दिला असून तिची विधिवत पूजा केली जाते. भेल डुमरा गावातील रहिवासी विजेंद्र कुमार सिंह उर्फ मुखिया सिंह यांच्या गायीने जन्म दिलेली ही जवळपास 4 वर्ष वयाची गाय आहे. गेल्या वर्षभरापासून ती सलग दूध देते. परंतु मालक तिचं दूध वापरत नाहीत किंवा विकतही नाहीत. तर, शिवलिंगावर वाहतात.

श्रावण महिन्यात पहिल्यांदा या गायीच्या स्तनांमधून दूध निघाल्याचं मालकाच्या निदर्शनास आलं होतं. त्याने याबाबत गावकऱ्यांना सांगितलं असता, वासरू नसतानाही गायीच्या स्तनांतून दूध येणं आणि श्रावण महिन्यातच त्याची सुरुवात होणं, म्हणजे ही कामधेनू आहे असं गावकऱ्यांनी सांगितलं. तेव्हापासून या गायीला दररोज सजवलं जातं. तिची पूजा केली जाते. त्यानंतर तिचं दूध काढून शिवलिंगावर अर्पण केलं जातं. दररोज एका वेळेला ही गाय 2 लिटर दूध देते. तर काही वेळा दिवसातून दोनदा 5 लिटर दूध मिळतं. Ajab Gajab : बकरी नाही तर इथे बकरे देतात दूध, संपूर्ण प्रकार जाणून वाटेल आश्चर्य दरम्यान, कृषीतज्ज्ञ पीके दिर्वेदी यांनी याबाबत सांगितलं की, ‘हॉर्मोनल बदल झाले असता वासरू नसतानाही गायीच्या स्तनांमधून दूध येतं. या गायीतही हॉर्मोनल बदल झाले असावेत. काही वेळा बैलाच्या शरीरात हॉर्मोनल बदल झाले असतील तर त्याच्याही स्तनांमधून दूध येतं’, अशी माहिती त्यांनी दिली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या