मुंबई, 25 जून : आपल्या हे माहिती आहे की गाय, म्हैस किंवा शेळी दूध देते. त्यांचं दूध आपण नेहमीच पितो. पण तुम्हाला जर सांगितलं की बकरे देखील दूध देतात तर? तुमचा विश्वास बसेल? कोणतीही मादा दूध देते, हे ऐकायला ठिक वाटतं, पण पुरुष दूध देतंय हे थोडं विचित्रच आहे. सोशल मीडीयावर आपल्यासमोर बऱ्याचदा अशा काही गोष्टी समोर येतात. ज्यावर विश्वास ठेवणं देखील कठीण जातं. हे प्रकरण देखील सोशल मीडियावर समोर आलं आहे. खरंतर मध्यप्रदेशात असे बकरे आहेत. जे चक्क दुध देतात. याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्याने लोकांना या बातमीवर विश्वास ठेवायला भाग पाडले आहे. साधं दूध खराब होतं, पण पॅकेटमधील दूध कधी खराब का होत नाही? हा प्रकार मध्य प्रदेशातील बुरहानपूर येथील तुषार निमाडे यांच्या सरताज गोट फार्ममधून समोर आला आहे. येथे 4 बकरे हे शेळ्यांसारखे दूध देतात. ज्यामुळे हे बकरे आता कुतूहलाचा विषय बनला आहे. ज्यामुळे या बकऱ्यांना पाहण्यासाठी लोक दूरदूरहून येथे पोहोचत आहेत आणि त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. वास्तविक मध्य प्रदेशातील बुऱ्हाणपूर येथील तुषार निमाडे यांच्या सरताज गोट फार्मवर 4 वेगवेगळ्या जातीचे बकरे आहेत, जे दिसायला बकऱ्यांसारखेच आहेत, परंतु बकरींप्रमाणेच ते दूध देखील देतात. स्तन नाही तरीही आपल्या पिल्लांना दूध पाजतं कबुतर, कसं? जाणून वाटेल आश्चर्य गोट फार्मचे ओनर आणि डॉ. तुषार निमाडे सांगतात की, या चार जातीच्या शेळ्या आहेत ज्या आम्ही वेगवेगळ्या प्रदेशातून आणल्या आहेत. त्यात पंजाबमधील बिटल बकरा, भिंड मुरैना येथील हंसा बकरा, हैदराबादची हैदराबादी बकरा तर अहमदाबाद येथून पाथीरा बकरा आणला. या बकऱ्यांची खास गोष्ट म्हणजे त्या दररोज 250 मिली ते 300 मिली दूध देत आहेत. या बकऱ्यांची किंमत १ लाखापासून ते अगदी तीन ते चार लाखांपर्यंत आहे. या बातमीने नेटकऱ्यांना देखील धक्का बसला आहे. अनेक लोक यावर विश्वास बसत नाही म्हणून स्वत: भेट द्यायाला देखील गेले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.