कोरोनाने पुन्हा वाढवलं टेन्शन
मुंबई : आता कुठे कोरोना कमी झालाय असं वाटत असतानाच पुन्हा एकदा झपाट्याने कोरोनाचे रुग्ण वाढायला सुरुवात झाली आहे. देशात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. दररोज ५ हजारांहून अधिक नवीन रुग्णांची नोंद होत आहे. कोरोना वेगानं पसरण्याचं प्रमाण देखील वाढलं आहे. गेल्या आठवड्यात म्हणजेच रविवारपर्यंत देशात ३६ हजारांहून अधिक नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली. आतापर्यंत कोरोनाचे रुग्ण 79 टक्क्यांनी वाढले आहेत. ही वाढ मागच्या 7 महिन्यांपेक्षा जास्त असल्याने अलर्ट जारी करण्यात आला आहे. गेल्या आठवड्यापर्यंत ज्या राज्यांमध्ये अपेक्षेपेक्षा कमी केसेस होत्या त्या राज्यांमध्येही आता व्हायरस वेगानं पसरत आहे.
टाइम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, 3 एप्रिल ते 9 एप्रिलपर्यंत भारतात कोरोनामुळे 68 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याआधीच्या आठवड्यात 41 जणांचा मृत्यू झाला होता. केरळमध्ये सर्वाधिक 11,296 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली.
कोरोनानं वाढवलं टेन्शन! पुढचे 20 दिवस महत्त्वाचे, चौथी लाट येणार? पाहा काय म्हणाले तज्ज्ञकेरळ पाठोपाठ आता महाराष्ट्रात झपाट्याने रुग्ण वाढत आहेत. महाराष्ट्रात 4,587, दिल्लीत 3,896, हरियाणामध्ये 2,140 आणि गुजरातमध्ये 2,039 रुग्णाचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. चिंतेची बाब म्हणजे केंद्र शासित प्रदेश आणि ज्या राज्यात कोरोनाचे रुग्ण कमी होते तिथेच वेगानं वाढताना दिसत आहेत.
इबोला सारख्या व्हायरसचा धोका, आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू पाहा काय आहेत लक्षणंपुन्हा एकदा मॉक ड्रिल सुरू केलं आहे. अनेक ठिकाणी मास्क सक्ती करण्यात आली आहे. याशिवाय सॅनिटायझरचा वापर करण्याचं आणि गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. ताप, सर्दी खोकला असल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असंही आवाहन करण्यात आलं आहे.